सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
पनवेल : भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार्यांचा ओघ सातत्याने कायम आहे. पक्षाचे नेतृत्व आणि कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन पनवेल तालुक्यातील रिटघर येथील शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शनिवारी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेस सोहळा झाला असून, त्यांनी प्रवेश कर्त्यांचे पक्षाची शाल देऊन स्वागत केले.
रिटघर येथील शिवसेनेचे रामभाऊ भगत, हरिभाऊ भगत, सिताराम भगत, गंगाराम भगत, बाळाराम भगत, विष्णू भगत, कृष्णा पाटील, तुकाराम भोपी, कुंडलीक पाटील, एकनाथ पाटील, अशोक भगत, बाळीराम भगत, जयवंत भगत, यशवंत भगत, धनाजी भगत, संतोष भगत, काशिनाथ पाटील, अजित भगत, संजित भगत, राजन भगत, शेखर भगत, अक्षय भगत, रोहित भगत, धिरज भगत, राजू भगत, रवि भगत, अनिकेत भगत, अदित्य भगत, ओमकार भगत, वसंत पाटील आदींनी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे.
या पक्ष प्रवेशावेळी भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव सदस्या, रेश्मा शेळके, पंचायत समिती सदस्य भुपेंद्र पाटील, राज पाटील, उपसरपंच रमेश पाटील, शशिकांत दिसले, सिताराम पाटील, सुनिल पाटील, अनुसया वाघमारे, भाऊबुवा सिनारे यांच्यासह पादाधकिारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्गहाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांछच्यासह उपस्थित मान्यवरांनी प्रवेश कर्त्यांचे पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले व मार्गदर्शन केले.