नवी मुंबई : युवासेना सानपाडा विभागातर्फे सानपाड्यातील वात्सल्य ट्रस्ट या संस्थेत अनाथ भगिनींसोबत दरवर्षी प्रमानेरक्षाबंधन सोहळा साजरा करण्यात आला. यावर्षी या सोहळ्याचे सहावे वर्ष होते.
या सोहळ्यास शिवसेना उपजिल्हा प्रमुख मिलींद सुर्यराव,नगरसेवक सोमनाथ वास्कर व कोमल वास्कर, विभागप्रमुख महेश बनकर, शिरीष पाटील, महिला उपशहर संघटक सावित्री चौगुले, युवासेना विधानसभा अधिकारी मयुर ब्रिद वसानपाड्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. युवासेनेतर्फे या भगिनींना रक्षाबंधनाची भेट म्हणून दरवर्षी एकलाखाचे आरोग्य विमा सुरक्षा कवच भेट म्हणुन देण्यात येते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवासेना सानपाडा विभाग अधिकारी आशिष खांडगे,उप विभाग अधिकारी मनोज जाकते, शाखाअधिकारी सुशिल गाडगे, जयेश जाधव, उप शाखाअधिकारी स्वप्निल गव्हाणे, अक्षय हांडे, आदेश टाव्हरे व सर्वयुवासेना पदाधिकार्यांनी मेहनत घेतली.