सानपाडा रेल्वे स्थानकातील उघडे चेंबर बंद
नवी मुंबईः शिवसेनेचा बालेकिल्ला असणार्या सानपाडा परिसरात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा दणका सर्वांना पहावयास मिळाला. सानपाडा रेल्वे स्टेशन मधील प्लॅटफॉर्म क्रमांक-४ वरील उघडे असलेले केबल चेंबर ‘राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस’ पदाधिकार्यांच्या दणक्यानंतर बंद करण्याची जाग रेल्वे प्रशासनाला आली.
सानपाडा रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक चार वरील उघडे असलेले केबल चेंबर गेल्या कित्येक दिवसांपासून प्रवाशांना ये-जा करण्यासाठी धोकादायक बनले होते. भूमिगत केबलच्या चेंबरचे
झाकण उघडे असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. सानपाडा रेल्वे स्थानकामध्ये रात्री असणार्या अपुर्या प्रकाशामुळे जर एखादा प्रवासी उघड्या केबल चेंबर मध्ये पडला असता तर त्यास प्राणास सुध्दा मुकावे लागण्याची शक्यता होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणार्या मार्गावर फलाट क्रमांक-चार वर सुरवातीलास उघडे केबल चेंबर असल्याने धावती लोकल पकडण्याच्या नादात रेल्वे प्रवासी उघड्या चेंबरमध्ये पडण्याची तसेच जखमी होऊन प्रवाशाच्या जीवावर देखील येण्याची शक्यता होती. याची दखल घेत सानपाडा विभागातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पदाधिकार्यांनी उघड्या केबल चेंबर बाबत सानपाडा रेल्वे स्थानकावरील रेल्वे अधिकार्यांना घेराव घालून त्यांना जाब विचारला. उघड्या केबल चेंबरमुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्याला रेल्वे प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा देऊन, उघडे केबल चेंबर ताबडतोब दुरुस्त करावे, या मागणीचे पत्रही राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तर्फे रेल्वे अधिकार्यांना देण्यात आले. ‘राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस’च्या मागणीची दखल लगेचच घेऊन रेल्वे प्रशासनाने उघडे केबल चेंबर तात्पुरत्या स्वरुपात बंद केले.
सिडको सोबत पत्रव्यवहार करुन येणार्या ३- ४ दिवसात नवीन झाकण बसवून सदर चेंबर पूर्णपणे बंद करण्यात येईल, असे आश्वासन रेल्वे अधिकार्यांनी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पदाधिकार्यांना दिले. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पदाधिकार्यांनी उघडे केबल चेंबर बंद करण्याच्या मागणीचे निवेदन सिडको कार्यकारी अभियंता (रेल्वे) यांना देखील दिले. यावेळी ‘राष्ट्रवादी’चे ड प्रभाग समिती सदस्य सुनील कुरकुटे, सानपाडा वॉर्ड अध्यक्ष राजेश ठाकूर, प्रवीण पाटील, राजेंद्र शेडगे, सुनील चव्हाण, राम प्रजापती, सिध्दार्थ रायगावकर, श्रीकांत लाडके, विश्वास शिंदे, सचिन दुर्गुडे, राहुल बाबर आदी उपस्थित होते.