युवा सेनेची पालिका शिक्षणाधिकार्यांसह मुख्याध्यापकांकडे मागणी
नवी मुंबई : शाळा सुरू होवून चार महिने लोटले तरी महापालिका शाळेतील काही मुलांना पुस्तके मिळालेली नाहीत, त्यामुळे आता ऑक्टोबर महिना आला, आता तरी पालिका शाळेतील मुलांना अभ्यासासाठी पुस्तके द्या अशी मागणी युवा सेनेचे नेरूळ विभाग युवा अधिकारी अजित खताळ यांनी नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या शिक्षण अधिकार्यांकडे व सारसोळेच्या महापालिका शाळेतील मुख्याध्यापकांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
सारसोळेच्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळेतील इयत्ता चौथीच्या ३ गरीब व हुशार विद्यार्थ्यांना अद्यापि पुस्तके मिळाली नसल्याचे अजित खताळ यांनी पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. पालिका शिक्षणाधिकारी कार्यालयात लेखी निवेदन दिल्यावर अजित खताळ यांनी युवा सेनेचे बेलापुर विधानसभेचे उप विधानसभा युवा अधिकारी निखिल मांडवे यांच्यासोबत जावून सारसोळेच्या महापालिका शाळेतील मुख्याध्यापकांनाही निवेदन सादर केले आहे.