नवी मुंबई : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस जुईनगर सेक्टर २४ मधील ज्येष्ठ नागरिक विरगुंळा केंद्रात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ब प्रभाग समिती सदस्य विजय साळे यांनी ज्येष्ठाकरिता ठेवलेल्या कार्यक्रमाने परिसरातील ज्येष्ठ नागरिक भारावून गेले.
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विरगुंळा केंद्रात सर्व ज्येष्ठांचा सामूहिक वाढदिवस औपचारिकरित्या साजरा करण्याच्या कार्यक्रमाचे ब प्रभाग समिती सदस्य विजय साळे यांनी आयोजन केले होते. यावेळी ज्येष्ठ नागरिकांनीकेक कापला. विजय साळे यांनी स्वत: ज्येष्ठ नागरिकांना केक भरवित ज्येष्ठांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, ज्येष्ठांशी सुसंवाद साधताना यावेळी विजय साळे यांनी आजच्या समाजव्यवस्थेत असलेले ज्येष्ठांचे महत्व विषद करून आजच्या तरूण पिढीने घरातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन पावलापावलावर घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
केक कापण्याच्या कार्यक्रमानंतर आपल्या मुलाने आपला वाढदिवस साजरा केला असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली. या कार्यक्रमात विरगुंळा केंद्रातील ६२ ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी विरगुंळा केंद्राचे अध्यक्ष नलावडे आणि सचिव भारत कवडे यांनी विशेष सहकार्य केले असल्याची माहिती विजय साळे यांनी यावेळी दिली.