नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसरातील व सारसोळे गावाच्या प्रवेशद्वारावरील कै. बुध्या बाळ्या वैती मार्गानजिकच्या साई गणेश सोसायटीतील ‘भाईजान’ फुड फालूदाचे उद्घाटन नवी मुंबई महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. सुजाताताई सुरज पाटील आणि प्रभाग ८६च्या नगरसेविका सौ. जयश्री एकनाथ ठाकूर यांच्या हस्ते गुरूवारी सांयकाळी झाले.
गुरुवारी सांयकाळी या फालूदा सेंटरचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी नवी मुंबईच्या राजकारणात कुकशेतचा ढाण्या वाघ म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सुरज पाटील, शिवसेनेचे माजी नगरसेवक व विभागप्रमुख रतन मांडवे, महापालिका ‘ब’ प्रभाग समिती सदस्य मनोज यशवंत मेहेर आणि विजय साळे, ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील, प्रभाग ८६चे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष महादेव पवार, गोविंद मेहेर, ‘माझा’ स्नॅक्स सेंटरचे दिनेशभाई यांच्यासह स्थानिक रहीवाशी उपस्थित होते.
‘भाईजान’ फुड फालूदा’ केंद्राच्या व्यवस्थापणाला शुभेच्छा देताना सभापती सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी आपल्या व्यवसायात परिश्रमाने समृध्दी येईल असा आशावाद व्यक्त केला.