दोनच दिवसापूर्वी वाशीतील एका किशोरवयीन अल्पमती घटकाकडून सिडकोच्या इमारतीच्या पुर्नबांधणीबाबत नवी मुंबईचे शिल्पकार असलेल्या लोकनेते गणेश नाईकांवर आरोप केले.हे आरोप बालिशपणाचे, बिनपुराव्याचे व केवळ आपले अपयश झाकण्यासाठी जनसामान्यांचा जनाधार असलेल्या घटकाची जाणिवपूर्वक बदनामी करण्यासाठी रचण्यात आलेल्या षडयंत्रातून झालेली चिखलफेक आहे, हे नवी मुंबईकरांच्या लगेचच लक्षात आले. देवाचा भक्त म्हणून बुरखा पांघरूण मंदिराच्या गाभार्यात वावरायचे आणि नंतर देवळातून बाहेर पडल्यावर त्याच देवाच्या नावाने शंख फुकायचा हे भक्तीमय वातावरणात व सदोदीत देवपुजेत तल्लीन असणार्या भाविक प्रवृत्तीच्या नवी मुंबईकरांच्याही एव्हाना लक्षात आले असणार.
किशोरवयीन अल्पमती घटकाने आता राज्यात व केंद्रात त्याच्या पक्षाचे सरकार असताना इमारत पुर्नबांधणीबाबत अपयश आल्यावर स्थानिक रहीवाशांना काय उत्तर द्यायचे हे न सुचल्याने नवी मुंबईकरांवर पुत्रवत प्रेम करणार्या लोकनेते गणेश नाईकांवर आरोप केले. ज्या गणेश नाईकांनी स्वत:च्या घरापेक्षाही अधिक हित नवी मुंबईच्या विकासामध्ये पाहिले, नवी मुंबईकरांच्या सुविधांमध्ये पाहिलेे, त्या माणसावर आरोप करण्याचे पातक हा वाशीतील किशोरवयीन अल्पमती घटक करून बसला. परिणाम काय झाला, ज्या गणेश नाईकांवर आरोप करून, चिखलफेक करून प्रतिमा मलीन करण्याचा बालीशपणा केला, त्यातून लोकनेते गणेश नाईकांची प्रतिमा मलीन न होता उजळून निघाली. बावनकशी सोने घरात असले अथवा घराबाहेर असले तरी त्याची चमक कोणीही कमी करू शकत नाही. गेल्या साडे तीन दशकात नवी मुंबईकरांनी जनता दरबाराच्या माध्यमातून, सार्वजनिक कार्यक्रमात तसेच मेळावे, खासगी कार्यक्रमात जवळून पाहिले, त्यांना या प्रकारामुळे संताप आला असून या किशोरवयीन अल्पमती घटकाचा व त्याला हे करण्यास प्रवृत्त करून त्याच्याआडून लोकनेते गणेश नाईकांची प्रतिमा मलीन करू पाहणार्याचा राजकीय भेसूर चेहराही नवी मुंबईकरांना पहावयास मिळाला. गणेश नाईक हिस्सा मागतात, हे विधान जाणिवपूर्वक करत आहोत, पण त्यांचा हिस्सा परिश्रमाचा असतो. नवी मुंबईकरांना सुविधा मिळवून देण्यामध्ये आणि नवी मुंबईकरांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांच्या परिश्रमाचा हिस्सा ३३ टक्के नाही तर १०० टक्के असतो. हा हिस्सा ते लोकल्याणासाठी आणि नवी मुंबईकरांच्या चेहर्यावर हास्य फुलविण्यासाठी मागून घेतात. लोकनेते गणेश नाईकांनी जनता दरबाराच्या माध्यमातून नवी मुंबईकरांचा व प्रशासनाचा सुसंवाद सातत्याने ठेवला. जनता दरबाराच्या माध्यमातून नवी मुंबईकरांची कामे केली, प्रलंबित प्रश्न सोडविले, अनेक गरीब व गरजूंना आर्थिक मदतीचा हातभार लावत त्यांच्या समस्यांचे निवारण केले. लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी करावयास लागणार्या परिश्रमामध्ये त्यांनी ३३ टक्के नाही तर १०० टक्के हिस्सा मागितला आहे. परंतु आम्ही नवी मुंबईकर मात्र लोकनेते गणेश नाईकांच्या परिश्रमाची पोचपावती देण्यास कोठेतरी कमी पडलो. ज्या माणसाने आपली साडे तीन दशके नवी मुंबई शहराच्या व नवी मुंबईकरांच्या विकासासाठी खर्ची घातली, त्या माणसाशी प्रामाणिकपणा न दाखविण्याचा अपराध नव्हे तर घोर अपराध आम्हा नवी मुंबईकरांच्या हातून घडला. प्रामाणिकपणे विकासकामे करणार्या आणि आपली उभी हयात नवी मुंबई शहर व नवी मुंबईकरांसाठी खर्ची घालणार्या नेतृत्वाच्या बाबतीत कृतज्ञ न राहता केवळ राजकीय लाटेच्या आहारी जावून नवी मुंबईकरांनी कृतघ्नपणा दाखविला, हा संदेश मागील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्रात गेला आहे. मतदानात घेतल्या गेलेल्या चुकीच्या निर्णयामुळे महाराष्ट्रात नवी मुंबईची प्रतिमा मलीन झाली आहे. वाशीतील किशोरवयीन अल्पमती घटक ज्या पक्षात कार्यरत आहेत, त्या पक्षाचा ठाणे जिल्ह्यात पालकमंत्री आहे, त्या किशोरवयीन घटकानेच आता जाहिर करावे, त्यांच्या पक्षाच्या पालकमंत्र्यांनी किती वेळा मेळावे घेवून नवी मुंबईकरांशी सुसंवाद साधला, किती जनता दरबार घेतले, किती व्यक्तीगत समस्या नवी मुंबईकरांच्या सोडविल्या. याचे उत्तर वाशीतील किशोरवयीन अल्पमती घटक देणार नाही. परंतु नवी मुंबईकरांना याचे उत्तर माहिती असल्याने ते सर्व जाणून आहेत. मागील विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत झालेल्या चुकीचा आणि निर्माण झालेला काळीमा पुसण्यास आता नवी मुंबईकर उत्सूक आहे. निवडणूका तोंडावर आल्याने इमारतीच्या पुर्नबांधणीबाबत या किशोरवयीन अल्पमती घटकाच्या व त्याच्या पक्षाच्या पाठपुराव्याला चार वर्षात अपयश अपयश आल्याने हे चिखलफेकीचे षडयंत्र राबविण्यात आले, हे न समजण्याइतपत नवी मुंबई्रकर आता अज्ञानी व दुधखुळे राहीलेले नाहीत.
नवी मुंबई ही वारकर्यांची, भाविकांची, साधूसंतांची, स्वातंत्र्य सैनिकांची, किर्तनकारांची भूमी आहे. पंधरा वर्षात ज्या मंदिरात राहायचे, त्या देवाचा भक्त असल्याची जनसामान्यात प्रतिमा निमार्र्ण करायची आणि आपला स्वार्थ साधून झाल्यावर मंदिराच्या बाहेर पडता देवाला नाव ठेवू पाहणार्या या कृतघ्न कर्मठ असणार्या अल्पमती किशोरवयीन घटकाला व त्याच्या पक्षाला येत्या निवडणूकीत नवी मुंबईतील भाविक, माळकरी, टाळकरी, वारकरी, किर्तनकार मंडळी निश्चितच धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत.
नवी मुंबईतील इमारतींचा पुर्नविकास का झाला नाही, हा प्रश्न गेल्या १५ वर्षात सातत्याने उपस्थित केला जात आहे. त्याबाबत काही वस्तूस्थितीवर आधारीत खुलासा करणे आवश्यक आहे. सिडकोने नवी मुंबई शहर वसविताना जी मार्केट, इमारती याबाबत जी बांधकामे केली, त्यातील वाशी, नेरूळ, कोपरखैैराणे परिसरातील गृहनिर्माण बांधकामे अल्पावधीत धोकादायक ठरली. एपीएमसीतील कांंदा बटाटा मार्केटही अल्पावधीत धोकादायक ठरले. या पार्श्वभूमीवर सिडकोने ही बांधकामे करून झाल्यावर जी परिस्थिती उद्भवली होती. त्यासाठी योग्य तो निर्णय घेणे गरजेचे होते. इमारतींचे आयुष्य आणि धोकादायक ठरविण्याची परिस्थिती व या परिस्थितीला जबाबदार असणारे सिडकोचे अधिकारी या सर्वाचा महाराष्ट्र सरकार पातळीवर तसेच सिडको पातळीवर योग्य चौकशीद्वारे निष्कर्षास येणे हे प्रमुख काम लोकनेते गणेश नाईकांनी प्रारंभापासून केल्याचे विसरून चालणार नाही. लोकनेते गणेश नाईकांनी ही प्रक्रिया केली नसती तर आजच्या घडीला पुर्नबांधणी, धोकादायक इमारतींचा पुर्नविकास, एफएसआय हे विषय आज चर्चेला आले नसते, प्रकाशझोतात आले नसते आणि मार्गीही लागले नसते याचे श्रेय केवळ आणि केवळ लोकनेते गणेश नाईकांचेच आहे. आज वाशीतील एक किशोरवयीन अल्पमती घटक आरोप करतोय, तो तर १५ वर्षे त्याच मंदिरात भाविक म्हणून वावरत होता, याबाबतीतील लोकनेते गणेश नाईकांनी परिश्रम व पाठपुरावा केल्याचे त्या अल्पमती किशोरवयीन घटकानेही जवळून पाहिले आहे.
इमारती धोकादायक ठरवल्यानंतर जबाबदार अधिकार्यांवर कारवाई करणे हे सिडकोचे दायित्व होते. त्यात सध्या सत्ताधारी पक्षामध्ये मोठ्या पदावर असणारे व काही काळ त्या पक्षाची नवी मुंबईच्या कारभाराची धुरा सांभाळणारे पदाधिकारी हे सिडकोतून व्हीआरएस घेवून घरी बसले आहेत, हेही नवी मुंबईकरांना माहिती आहे. नवी मुंबईचे शिल्पकार असलेल्या लोकनेते गणेश नाईकांची उभ्या आयुष्यातील बांधिलकी ही सर्वसामान्य तळागाळातील नवी मुंबईकरांशी जुळली गेली आहे. समर्पित झालेली आहे. गणेश नाईकांची भागिदारी हे सर्वसामान्य नवी मुंबईकरांच्या सुखदु:खाशी आहे. हे १५ वर्षे ज्या किशोरवयीन घटकाला समजले म्हणूनच त्याचा प्रारंभापासून आम्ही अल्पमती असा उल्लेख करत आहोत. ज्या नवी मुंबईकरांनी लोकनेते गणेश नाईकांवर प्रारंभापासून बेफाम प्रेम केले, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला, प्रेमाने त्यांना घरातील वडीलधारी सदस्य म्हणून ‘दादा’ ही उपाधी दिली. त्या नवी मुंबईकरांनी धोकादायक इमारतीमध्ये केवळ लाल फितीच्या कारभारात खितपत पडून राहणे हे नवी मुंबईकरांप्रती भावनिक असलेल्या व संवेदनशील मनाच्या व हळव्या स्वभावाच्या गणेश नाईकांना सहन होणे शक्यच नाही. नवी मुंबई शहर हे गणेश नाईकांचे घर असून नवी मुंबईकर मंडळी ही गणेश नाईकांच्या घरातील सदस्य आहे. घराप्रती जागरूक असलेल्या मुलाला घराची पडझड होणे व घरातील सदस्यांनी धोकादायक जागेत निवासी वास्तव्य करणे कधीही पटणार नाही, त्यासाठी तो मुलगा जी धावपळ करतो, प्रयत्नांची पराकाष्ठा करतो, तीच बाब लोकनेते गणेश नाईकांनी गेल्या काही वर्षात सातत्याने केलेली आहे. या धोकादायक घरांमध्ये जीव मुठीत घेवून मृत्यूची टांगती तलवार शिरावर ठेवून वावरणार्या नवी मुंबईकरांना चांगल्या व मोठ्या घरामध्ये कसे नेता येईल यासंदर्भात आपल्या अधिकारात असलेले काम करण्यासाठी लोकनेते गणेश नाईकांनी पूर्णपणे झोकून दिले.
नवी मुंबईकरांच्या आशिर्वादाने व प्रेमामुळे नवी मुंबईकर आजही गणेश नाईकांच्या पाठीशी असल्यामुळे काही इमारतींची पुर्नबांधणी ही गणेश नाईकांच्याच कार्यकाळात झालेली आहे आणि दोन-तीन दिवसापूर्वी आरोप करणारे अल्पमती किशोरवयीन घटक अशाच एका पुर्नबांधणी झालेल्या इमारतीमध्ये आपणच राहत आहोत हे मात्र सोयिस्कररित्या विसरले आहेत, याचीही आठवण यानिमित्ताने करून दिल्यास चुकीचे वाटणार नाही. त्यामुळे जो जनकल्याणासाठी झटतोय, त्याच्याप्रती कृतज्ञ राहा,कृतघ्न होवू नका, केलेली पापे याच जन्मी याच भूतलावर सर्वांनाच फेडावी लागणार आहेत.
राजकारणात सक्रिय झालेले काही अधिकारी जे एका पक्षाची धुरा सांभाळताना आज पडद्यामागून सूत्रे हलवित आहेत व स्वत:ला अंत्यत बुध्दीमान समजत आहेत, ते त्या महत्वाच्या प्रशासकीय पदावर कार्यरत असताना पुर्नविकासाच्या संदर्भातील एकही प्रस्ताव अथवा एकही निर्णय न घेणारे आजमात्र कंठशोष करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. लोकनेते गणेश नाइर्रकांनी आघाडी सरकार सत्तेवर असताना तत्कालीन मुख्यमंत्र्यांना व कॅबिनेटला सातत्याने धोकादायक इमारती, त्याची पुर्नबांधणी याबाबत नवी मुंबईकरांचे दु:ख व त्यांना भोगावा लागणारा त्रास आणि सरकार म्हणून आपली जबाबदारी कशी आहे, हे ठामपणे व अत्यंत विनम्रपणे सांगून २.५, २,१.८ अशा पध्दतीची चटई क्षेत्राची रचना यशस्वीरित्या कागदोपत्री आणून नवी मुंबईकरांना पुर्नविकासाचा मार्ग मोकळा करून देणारे दुसरे – तिसरे कोणी नसून लोकनेते गणेश नाईकच आहेत, ही वस्तूस्थिती गणेश नाईकांवर आरोप करणारे राजकारणातील त्यांचे कडवट विरोधकही नाकारू शकणार नाहीत.
आज ज्या किशोरवयीन अल्पमती घटक आरोप करत आहेत, तेच घटक मागील १५ वर्षाच्या कार्यकाळात वाशीकरांना आपणच लोकनेते गणेश नाईकांचे मानसपुत्र असल्याचे भासवित या पूर्ण प्रक्रियेमध्ये सहभागी होते. आज जे ३३ टक्केचा आरोप राजकीय हेतूने प्रेरीत होवून केवळ प्रतिमा मलीन करण्यासाठी करत आहेत, त्यांनी जे पुर्नविकासाचे करार केले आहेत, ते याच कार्यकाळात स्वत: केले आहेत, याचाही वाशीकरांना व नवी मुंबईकरांना विसर पडलेला नाही. मला यानिमित्ताने एक आर्वजून नमूद करावेसे वाटते की, संपूर्ण प्रकल्प,सत्ता, अधिकार नाईक परिवाराच्या घरात असताना लोकनेते गणेश नाईकांनी अथवा त्यांच्या घरातील सदस्यांनी कोणीही स्वत:च्ूयरा फायद्यासाठी एकही करार केला नसताना फक्त ३३ टक्केसाठी आता का म्हणून दबाब आणतील याचाही सुज्ञ नवी मुंबईकरांनी यानिमित्ताने विचार करणे आवश्यक आहे. ज्या गणेश नाईकांनी आपले उभे आयुष्य नवी मुंबईकरांसाठी व या शहराच्या विकासासाठी समर्पित केले आहे, ते असे करणे शक्यच नाही याची नवी मुंबईकरांनाही खात्री आहे. आपले अपयश झाकण्यासाठी वाशीतील अल्पमती किशोरवयीन घटकाने केलेले आरोप म्हणजे नैराश्येतून मनोरूग्णतेकडे वाटचाल करणार्या घटकाने सूर्यावर थुंकी उडविण्याचा प्रकार आहे, यातून काय साध्य झाले हे नव्याने सांगण्याची गरज नाही. सुर्याचे तेजोवलय कोणीही पुसू शकत नाही. सुर्यावर थुंकू पाहणार्यावरच त्याचीच थुंकी पडली असून येत्या काळात या घटकाने आपला चेहरा लपवून या नवी मुंबई शहरातून पळ काढला नाही म्हणजे मिळविले.
आरोप प्रक्रियेनंतर वाशीतील पुर्नबांधणीसाठी बहूचर्चित असलेल्या त्या परिसरात फिरल्यावर आणि तेथील स्थानिक लोकांशी चर्चा केल्यावर खरा प्रकार आढळून आला आणि तो प्रकार महाभयावह आहे. ज्या माणसावर विश्वास ठेवला, त्याच माणसाने सदनिका गिळण्याचा एककलमी कार्यक्रम मागील काळात राबविला असल्याचा संताप तेथील स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त केला जात आहे. राजकारणी झालेले माजी अधिकारी आणि आरोप करणारे अल्पमती किशोरवयीन उदयोन्मुख नेतृत्व यांनीच पुर्नविकास लांबवून कंटाळलेल्या नागरीकांना त्यांच्या घराची गेल्या बाजारभावाची किंमत देवून घरे विकत घेण्याचा सपाटा लावला आहे. आमच्या माहितीनुसार किमान १०० ते १५० घरे या तंत्रामुळे विकत घेतली गेली आहेत व आता हा प्रकार उघडकीस येत असल्यामुळे व त्या परिसरातील नागरिकांमध्ये रोष वाढत असल्यामुळे तसेच निवडणूका जवळ आल्यामुळे नवी मुंबईकरांना संभ्रमित करण्यासाठी हे आरोप गणेश नाईक व त्यांच्या परिवारातील सदस्यांची प्रतिमा मलीन करण्यासाठीच केले जात असल्याचे पाताळयंत्री षडयंत्र एव्हाना नवी मुंबईकरांच्याही लक्षात आले आहे.
आज कोणतेही पद नसताना लोकनेते गणेश नाईकांचे वलय, प्रतिमा, आदराची भावना, जवळीक, स्नेह नवी मुंबईकरांमध्ये कायम आहे. दिवसरात्र जनसेवेसाठी समर्पित केलेला लोकनेता आजपावेतो कोणत्याही आमिषाला बळी पडलेला नाही. आरोप करणार्यांना आरोप सिध्द करता आले नाही. म्हणून गणेश नाईकांना ३३ टक्के भागिदारीत नाही तर १०० टक्के भागिदारीत स्वारस्य आहे. पण ही भागिदारी पुर्नविकासात नाही, अडल्या नाडल्या वाशीकरांच्या सदनिका विकत घेण्यात नाही तर नवी मुंबईकरांना सुविधा देण्यात, त्यांचे अश्रू पुसण्यासाठी हवी आहे हे आज या अल्पमती किशोरवयीन घटकांना ठणकावून सांगण्याची योग्य वेळ आलेली आहे. नवी मुंबईकर सुज्ञ व समजंस आहे. कोणाची प्रतिमा काय आहे, कोणाची वाटचाल सुरूवातीपासून आतापर्यत काय आहे हे कोणाला नव्याने सांगण्याची गरज नाही.
– संदीप मेहेर