नवी मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग ८५च्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यसम्राट नगरसेविका आणि नवी मुंबई महापालिका महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी ११ ऑक्टोबरच्या महापालिका प्रभाग समितीच्या बैठकीत सारसोळे जेटीवर बंद असणार्या हायमस्टचा विषय उपस्थित करत, सारसोळेच्या ग्रामस्थांना प्रकाश देता येत नसेल तर हायमस्ट काढून घेवून जा, अशी कानउघडणी केली. सभापती सुजाताताई पाटील यांनी या समस्येचे गांभीर्य पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून देताना संताप व्यक्त करत प्रशासनाला धारेवर धरले व अवघ्या ७२ तासाच्या आता जेटीवरील हायमस्टची दुरूस्ती झाली व जेटीवरील परिसर उजळून निघाला.
आपल्या संतप्त भूमिकेतून प्रभाग समितीच्या बैठकीत सभापती सुजाताताई पाटील यांनी जेटीवरील बंद हायमस्टमुळे सारसोळे ग्रामस्थांच्या जेटीवर रात्रीच्या अंधारात मासेमारीसाठी ये-जा करावे लागत असल्याचे पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. रविवार सुट्टीचा दिवस असताना सारसोळे जेटीवरील बंद हायमस्टमुळे सोमवारी पुन्हा सभापती सुजाताताई पाटील यांच्या उद्रेकाचा सामना करावा लागू नये म्हणून पालिका प्रशासनाने युध्दपातळीवर धावपळ करत नादुरूस्त हायमस्टची दुरूस्ती केली. त्यामुळे मितभाषी असणार्या सभापती सुजाताताई पाटील बोलत नाहीत, पण त्यांची कामे बोलतात आणि त्यांच्या कामाचा आवाज हा विरोधकांच्या कानठळ्या बसविणारा असतो अशी प्रतिक्रिया सारसोळेच्या ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
११ ऑक्टोबर रोजी झालेल्या प्रभाग समितीच्या बैठकीत सभापती सुजाताताई पाटील यांनी सारसोळे जेटीवरील बंद हायमस्टचा मुद्दा उपस्थित पालिका प्रशासनाची कानउघडणी करत गलथान कारभाराची लक्तरे चव्हाट्यावर मांडली. सारसोळेच्या ग्रामस्थांना मासेमारीसाठी खाडीत जाताना भरती-ओहोटीचे गणित सांभाळत रात्री-अपरात्री जावे लागते. जेटी परिसरात साप, नाग व अन्य विषारी प्राण्यांचा वावर असतो. त्यातून दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण असणार असा संतप्त प्रश्नही त्याच बैठकीत सभापती सुजाताताई पाटील यांनी बैठकीत पालिका प्रशासनाला विचारला होता. याशिवाय रात्रीच्या अंधारामुळे सारसोळेच्या चार ग्रामस्थांची तब्बल १४ जाळी अज्ञात समाजकठंकांनी जाळली होती. जाळी जाळणारे अद्यापि फरार आहेत. जाळी जळाल्यामुळे ग्रामस्थांचे तब्बल ४ लाख ९० हजार रूपयांचे नुकसान झाले. यामुळे सारसोळेच्या ग्रामस्थांना जेटीच्या माध्यमातून आपणास उजेड देता येत नसेल तर हायमस्ट त्या जागेवरून काढून घ्या असा उद्रेकही सभापती सुजाताताई पाटील यांनी बैठकीत व्यक्त केला होता.
रविवारी सारसोळेच्या नादुरूस्त हायमस्टची पालिका प्रशासनाने दुरूस्ती केल्यामुळे खाडीअर्ंतगत परिसर उजळून निघाला आहे.