नवी मुंबई : नेरूळ सेक्टर दोनमधील पदपथांची दुरावस्था झाल्यामुळे त्या पदपथांच्या डागडूजीची मागणी प्रभाग ८४चे भाजप अध्यक्ष विलास वसंत चव्हाण यांनी महापालिका विभाग अधिकार्यांकडे लेखी निवेदनातून केली आहे.
एक वर्षापूर्वी या पदपथांच्या दुरूस्तीच्या कार्यक्रमाचे शिवसेना उपनेते आणि मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे अध्यक्ष विजय नाहटा यांच्या हस्ते उद्घाटन झाले असल्याचे विलास चव्हाण यांनी निवेदनातून महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. या कामाचा शुभारंभ अद्यापि झाला नसल्याने ही कामे होणार आहेत अथवा नाहीत हे महापालिका प्रशासनाने लेखी कळवावे अन्यथा ही समस्या आम्हाला महापालिका आयुक्त आणि भाजप आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या निदर्शनास आणून द्यावी लागेल असा इशारा विलास चव्हाण यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.