- सिडको महागृहनिर्माण योजना ऑगस्ट- 2018 मधील पात्र अर्जदारांकरिता नुकतीच 02 ऑक्टोबर 2018 रोजी संगणकीय सोडत यशस्वीरीत्या पार पडली. सोडती दरम्यान यशस्वी ठरलेल्या अर्जदारांना इरादापत्रे ई-मेल व पोस्टाद्वारे पाठविण्यात आली आहेत. परंतु ज्या अर्जदारांना अद्याप इरादापत्र प्राप्त झालेली नाहीत ते यशस्वी अर्जदार सिडकोच्या https://lottery.
cidcoindia.com या संकेतस्थळावरून इरादापत्राची प्रत दिलेल्या सुचनांचे अनुकरण करुन डाऊनलोड करु शकतात.
यशस्वी अर्जदारांनी आवश्यक ती कागदपत्रे ॲक्सीस बँकेच्या दिलेल्या शाखांमध्ये दोन संचांमध्ये दिनांक 19/10/2018 ते 22/11/
यशस्वी अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे अर्जदारास पात्र अथवा अपात्र ठरविण्याबाबत अंतिम निर्णय सिडको महामंडळाने स्थापन केलेल्या छाननी समितीद्वारे घेण्यात येईल. अर्जदारांस इरादित झालेली सदनिका स्वत:हून रद्द करायाची असल्यास किंवा अनेक ठिकाणी केलेल्या अर्जांपैकी एकापेक्षा अधिक सदनिका इरादित झाल्या असल्यास अशा अर्जदारांनी त्यांच्या पसंतीची एक सदनिका वगळता अन्य सदनिकांचे इरादापत्र रद्द करण्याबाबतचा अर्ज लेखी स्वरूपात 22 नोव्हेंबर २०१८ पर्यंत व्यवस्थापक (पणन-2) यांच्या कार्यालयात सादर करावा. यशस्वी अर्जदारांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता न केल्यास अथवा त्यांना वाटपित झालेली सदनिका स्वेच्छेने नाकारल्यास अशा प्रकारच्या रद्द केलेल्या सदनिका या प्रतिक्षा यादीवरील समान प्रवर्गातील अर्जदारांना वाटप करण्यात येतील.
सदर योजनेची सोडत ही पूर्णत: संगणकीय पद्धतीने काढण्यात आली असल्याने त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप संभवत नाही, याची नोंद घेण्यात यावी. सोडतीचा सविस्तर तपशिल https://lottery.