मुंबई : लोकनेते गणेश नाईक यांनी स्थापन केलेल्या श्रमिक सेना युनियनच्या पाठपुराव्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या घंटागाडी कचरा वाहतूक कर्मचार्यांना किमान वेतनासह थकबाकी देण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने या कामगारांची दिवाळी आनंदात जाणार आहे.
श्रमिक सेनेचे अध्यक्ष डॉ. संजीव गणेश नाईक यांच्या उपस्थितीत या कामगारांनी शनिवारी दिघा येथील प्रभाग समितीत आनंदोत्सव साजरा केला. किमान वेतन हा कामगारांचा हक्क आहे आणि तो त्यांच्यापासून कुणी हिरावून घेवू शकत नाही, असे डॉ. नाईक म्हणाले.
पालिकेचे तत्कालिन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यामुळे हे कामगार किमान वेतनापासून वंचित राहिले होते मात्र श्रमिक सेनेने कोर्टात लढा देवून किमान वेतन थकबाकीसह या कामगारांना मिळवून दिले. लोकनेते गणेश नाईक यांच्या निर्देशानुसार तत्कालिन महापौर विद्यमान ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर सोनावणे, विद्यमान महापौर जयवंत सुतार, सभागृहनेते रविंद्र इथापे, स्थायी समितीचे सभापती सुरेश कुलकर्णी, नगरसेवक नवीन गवते आणि त्यांच्या सर्वच सहकार्यांनी पालिका सभागृहात या कर्मचार्यांसाठी किमान वेतनाचे समर्थन केले होते. नवी मुंबई पालिका व परिवहन उपक्रमातील कर्मचार्यांना स्वस्त, परवडणारी घरे उपलब्ध करुन द्यावीत, यासाठी श्रमिक सेना युनियन प्रयत्नशील असून २०० कोटी रुपयांच्या तरतुदीतून पहिली घरसंकुल योजना साकारली जाणार आहे, अशी माहिती डॉ.नाईक यांनी याप्रसंगी दिली.
या आनंदोत्सवाप्रसंगी नगरसेवक नवीन गवते, राष्ट्रवादी कॉंग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष दिनेश पारख, विठ्ठल बांगर, युवक उपाध्यक्ष राजेश मढवी, माजी प्रभाग समिती सदस्य दीपक पाटील, अमर सुतार, अनिल नाकते, प्रभाग समिती सदस्य दामोदर कोटीयन, श्रमिक सेना युनियनचे कमिटी सदस्य लक्ष्मण उतेकर, परशुराम चव्हाण, संतोष कुर्हाडे, वैभव तांबे, दत्तू माने, दत्ता ढवळे, राजेश पाटील, समिर दाबेकर, बाळकृष्ण नाईक, राजेश नाईक, अनिल द्युम, राजेंद्र लोहार, राजू मोरे, मोतीराम काळे, संतोष मौर्या, अनुरात वाघमारे, हितेश पाटील, चंद्रकांत उत्तेेकर, विठ्ठल शिंदे, योगेश कदम संतोष मुळे, विजय जिलके आदी उपस्थित होते.