पनवेल : पनवेल तालुका सांस्कृतिक सेल व नादब्रह्म साधना मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक ७ नोव्हेंबर रोजी रांजणपाडा खारघर येथे ‘दिवाळी पहाट’ चे आयोजन करण्यात आले आहे.
या सांस्कृतिक सोहळ्याची सुरुवात भारतरत्न उस्ताद बिस्मिला खान यांचे शिष्य पंडित शैलेश भागवत यांच्या सनई वादनने होणार असून मुंबई येथील नुपूर गाडगिळ तसेच रायगड भूषण पंडित उमेश चौधरी यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. तर समारोप भजनसम्राट निवृत्तीबुवा चौधरी व शिष्यगण यांच्या गायनाने होणार आहे. या सोहळ्यात ह.भ. प. राजाराम महाराज पाटील यांचा गौरवमुर्ती सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशिला घरत, सभागृह नेते परेश ठाकूर, सिडकोचे मुख्य अभियंता केशव वरखेडकर, डायरेक्टर ऑफ फिल्म इंडस्ट्रीजचे दास बाबू, डॉ. गिरीश गुणे, मुंबई प्रसिद्ध सितार वादक उस्ताद अजीम खान, उद्योगपती हिरजीभाई गामी, मुंबई एसीपी विजय एल. त्रिभुवन, तसेच महादेवबुवा शहाबाजकर, दत्तबुवा पाटील, शंखूनाथबुवा पडघेकर, गणेश बंडा, नंदकुमार पाटील, प्रदीप दीक्षित, माउली सावंत, हरिबुवा वाजे, भगवानबुवा लोककरे, बाळकृष्णबुवा पाटील, ज्ञानेश्वर खरे, मधुकर घोगडें, धनंजय खुटले, अजित चिमणे, सुरज गोंधळी, विनायक प्रधान, प्रकाश पाटील, श्रीकांत पोवळे, धनंजय सुगवेकर आदी गायक व वादक मान्यवर उपस्थित असणार आहेत. या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पनवेल तालुका सांस्कृतिक सेल व नादब्रह्म साधना मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.