नवी मुंबई : शिवसेना शाखा क्रं ८७च्या माध्यमातून व माजी नगरसेवक – शिवसेना विभागप्रमुख रतन नामदेव मांडवे, स्थानिक शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळीनिमित्त स्वस्त दरात तेलाची विक्री करण्यात येत आहे.
रविवार, िद. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी शिवसेना शाखेसमोरच या स्वस्त दरात तेल विक्रीच्या कार्यक्रमास सुरूवात झाली असून गुरुवार, िद. १ नोव्हेंबरपर्यत हा कार्यक्रम चालणार आहे. दुकानापेक्षा स्वस्त दरात विकत भेटत असल्याने तेल खरेदी करण्यासाठी स्थानिक रहीवाशांची विशेषत: महिला वर्गाची या ठिकाणी गर्दी पहावयास मिळत आहे. गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना विभागप्रमुख रतन मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळीनिमित्त स्वस्त दरात ‘ना नफा, ना तोटा’ या तत्वावर स्थानिक रहीवाशांना तेलाची विक्री करण्याचा समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
हा तेलविक्रीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख गणेश कुलकर्णी, युवा सेनेचे बेलापुर विधानसभा उपशहर अधिकारी निखिल मांडवे, युवा सेनेचे पदाधिकारी विशाल गुंजाळ, शरद पाजंरी, गौतम शिरवाळे, मंगेश शिवतरकर, अनुभव बेळे, सौ. शलाका पाजंरी, सौ. जयश्री बेळे, प्रकाश वाघमारे, नामदेव दळवी, शंकर परब, भिकन पाटील, शंकर पडवळ, शुभांगी परब, संगीता चांदे यांच्यासह शिवसैनिक, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या व युवा सैनिक परिश्रम करत आहेत.