सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नेरूळ पश्चिमेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मातब्बर नेतृत्व गणले जाणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेरूळ तालुकाध्यक्ष यांची जनसामान्यांशी नाळ जुळलेली असल्याने पद, पैसा व प्रतिष्ठा असतानाही त्यांचे पाय आजही जमिनीवरच स्थिरावलेले पहावयास मिळतात. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रभागातील जनतेला व अन्य विभागातील नेरूळवासियांना उटणे वाटप करताना त्यांनी प्रबोधनाचे काम करत जनजागृतीवर भर दिल्यामुळे त्यांच्याकडून होणारा उटणे वाटपाचा कार्यक्रम नेरूळवासियांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
नेरूळ पश्चिम नोडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसची धुरा वाहणारे गणेश भगत, नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत, समाजसेवक रविंद्र भगत, किसमत भगत आदी कट्टर व कडवट गणेश नाईक समर्थक म्हणूनच ओळखले जातात. एप्रिल २०१५ साली झालेल्या महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीत गणेशदादा भगत यांच्या कार्यामुळे शिवसेना शहरप्रमुखांचा निवासी वास्तव्य असलेल्या बालेकिल्ल्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा सौ. रूपाली किसमत भगत यांना फडकविणे शक्य झाले. कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात गणेश पुजनानेच होत असल्यामुळे नेरूळ तालुकाध्यक्ष गणेशदादा भगत आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रभाग ९६ च्या नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा असणारे लोकनेते गणेश नाईक यांना उटणे देवून आपल्या अभियानाचा शुभारंभ केला. त्यावेळी उपस्थित असलेले माजी महापौर सागर नाईक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रतोद डॉ. जयाजी नाथ, महापालिका स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी, माजी स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के, शुभांगी पाटील, महापालिकेतील सभागृह नेते रवींद्र इथापे आदींनाही गणेशदादा भगत व सौ. रूपाली किसमत भगत आणि समाजसेवक रवींद्र भगत यांनी उटण्याचे वाटप केले.
प्रभाग ९६ व ९७ या दोन प्रभागामध्ये नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत, तालुकाध्यक्ष गणेशदादा भगत आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून घरोघरी जावून उटणे वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला आहे. या उटण्याच्या लिफाफ्यावर ‘पाणी वाचवा’, आपला परिसर स्वच्छ ठेवा, सुरक्षित दिवाळी साजरी करा आदी प्रबोधनात्मक संदेश छापून त्यातून समाजप्रबोधनावर भर देण्यात आला आहे. नेरूळ नोडमध्ये अनेक राजकीय घटकांकडून सध्या उटणे वाटपाचा कार्यक्रम जोरात सुरू असून त्यावर स्वत:ची व नेतेमंडळींची छायाचित्रे दिसत आहे, त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या भगत परिवाराची प्रबोधनात्मक जनजागृती प्रशंसेचा विषय बनला आहे.
उटने पाकिट तयार करण्यासाठी आणि घरोघरी वाटप करण्यासाठी समाजसेवक प्रदीप कलशेट्टी, चंद्रकांत महाजन, अशोक गांडाल, सूर्या पात्रा, गोरक्षनाथ गांडाल, संतोष पावसकर, राजेश घाडी, संदेश घाडी, सुभाष यादव, विशाल पाटिल, सूरज करपे, श्रेयश परशेट्टे, संजय गांडाल, अरुण यादव, संजय पिंगळे, राजू तूरे, वासुदेव पाटिल, रोहन कांबले, अनिकेत सनस, रोहन संक़पाल, रविंद्र भगत यांनी विशेष मेहनत घेतली.