स्वयंम न्यूज ब्युरो
नवी मुंबई : प्रभाग क्रं ९६ मधील नागरी समस्या सोडविण्यासाठी व नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करत आक्रमकपणे भूमिका मांडणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी प्रभागाच्या सुशोभीकरणाबाबत महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी, महापौर जयवंत सुतार आणि ब प्रभाग महापालिका विभाग अधिकाऱ्यांकडे आग्रही भूमिका मांडत लेखी पाठपुरावा सुरू केला आहे.
महापालिका आयुक्त, महापौर व महापालिका विभाग अधिकाऱ्यांना दिलेल्या लेखी निवेदनात नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी म्हटले आहे की, नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून महापालिका क्षेत्रात स्वच्छता अभियान गेल्या काही वर्षांपासून जोरदारपणे राबविले जात आहे,या वर्षी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये नवी मुंबईला प्रथम क्रमांक मिळणेसाठी महापालिका प्रशासना सोबत लोकप्रतिनिधी व नागरिकांचा सहभाग महत्वाचा ठरणार आहे. गृहनिर्माण सोसायट्यांच्या प्रदर्शनी भागातील संरक्षक भिंतीची रंगरंगोटी करून त्यावर सुभाषिते व सुविचार टाकल्यास प्रभागात कोठेही बकालपणा दिसणार नाही व परिसर सुंदर व स्वच्छ दिसेल. स्वच्छता अभियानाला पूरक भूमिका म्हणून स्थानिक नगरसेविका सौ.रुपाली किस्मत भगत यांनी स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अभियानांतर्गत नेरुळ प्रभागातील सेक्टर-१६,१६ए,१८ मधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या प्रदर्शनी भागातील संरक्षक भिंतीची रंगरंगोटी करून त्यावर सुभाषिते व सुविचार टाकण्याची मागणी नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी नवी मुंबईचे आयुक्त डॉ.एन रामास्वामी,महापौर जयवंतजी सुतार, ब विभाग अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.