सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : प्रभाग ९६च्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सौ.रुपाली किस्मत भगत यांनी नेरुळ प्रभागातील सेक्टर-१६,१६ए, १८ परिसरातील विविध नागरी कामे मार्गी लावण्याकरिता नवी मुंबई महापालिका प्रशासनाशी सतत पत्रव्यवहार करून त्याचा पाठपुरावा करत शाळा, ग्रंथालय व अभ्यासिका, महानगर पाईप गॅस जोडणी, रस्ते डांबरीकरण, गटर, पदपथ, उद्यान सुशोभीकरण, आकर्षक गजेबा, ओपन जिम साहित्य, कचरा डब्बे, टॉयलेट, दिशादर्शक फलक, एलइडी लाईट, जल वाहिनी, मलनिस्सारण वाहिनी, वाहनतळ, हायमास्ट व इतर नागरी कामे मंजूर करून घेतली आहेत.
मागील १० वर्षात नेरुळ सेक्टर-१६ ए मध्ये गटर ,रस्ते डांबरीकरण ,हायमास्ट, वाहनतळ, दिशादर्शक फलक, पार्किंग व्यवस्थेसाठी हेवी ड्युटी गटार झाले नाहीत , ती सर्व कामे नगरसेविका रुपाली किस्मत भगत यांनी प्रशासन दरबारी पाठपुरावा करून मंजूर करून घेतले त्या नागरी कामांचा उदघाटन सोहळा २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता इच्छापूर्ती श्री गणेश मंदिर सेक्टर-१६ए नेरुळ येथे नवी मुंबईचे शिल्पकार लोकनेते गणेश नाईक यांच्या हस्ते आणि नवी मुंबई महापौर जयवंतजी सुतारसाहेब यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला. त्यावेळी नेरुळ प्रभाग क्रमांक-९६ मधील उर्वरित कामे येत्या दोन महिन्यात मार्गी लागतील असे आश्वासन लोकनेते गणेश नाईक आणि महापौर जयवंत सुतार यांनी आपल्या भाषणात उपस्थित प्रभागातील नागरिकांना दिले, त्याच बरोबर प्रभागातील नागरिकांनी योग्य लोकप्रतिनिधी निवडल्यामुळे प्रभागातील १००% कामे पूर्ण होतील असेही सांगत नगरसेविका रूपाली किसमत भगत यांच्या परिश्रमावर शाबासकीची पोचपावती दिली.
सायंकाळी लोकनेते गणेशजी नाईकांनी मंदिरात श्री गणरायाच्या चरणी पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर नागरी कामांचे श्रीफळ वाढवून उदघाटन केले. नवी मुंबईतील सर्व स्तरावरील जनतेकरिता केलेले बहुमूल्य कार्य व सतत नवी मुंबईच्या विकासाकरिता असलेल्या प्रामाणिक प्रयत्नाबद्दल लोकनेते गणेशजी नाईक आणि महापौर जयवंत सुतार यांचा नागरी सत्कार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुकाध्यक्ष गणेशदादा भगत व वार्ड अध्यक्ष संजय पाथरे यांच्या हस्ते करण्यात आला.