सुजित शिंदे : ९९६१९१९७४४४
श्री संत ज्ञानेश्वर माऊली सांप्रदायिक सेवा मंडळ नेरुळ सेक्टर-१६ यांच्या वतीने रविवार दिनांक २३/१२/१८ ते दिनांक ३०/१२/१८ पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह तसेच श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नामवंत भागवत भक्तांची कीर्तने,प्रवचने व इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दैनंदिन कार्यक्रमा मध्ये सकाळी ८:३० ते ११:३० ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण,सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ आणि रात्री ८ ते १० कीर्तन होत असे
सप्ताह मध्ये कीर्तनकार ह.भ.प. मनोहर महाराज लांडे(जुन्नर ), विष्णू महाराजकेंद्रे (आळंदी ), एकनाथ महाराज सदगीर (ठाणे ), संपत महाराज हांडे (हिवरे खुर्द),.ज्ञानेश्वर महाराज कुऱ्हाडे (आळंदी ), उल्हास महाराज सूर्यवंशी (आळंदी ), समाधान महाराज रिंगणगावकर(जळगाव) यांची कीर्तने झाली.
काल्याचे कीर्तन ह.भ.प.श्री.पंढरीनाथ महाराज आरु (आळंदी ) यांनी केले नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी हजारो भक्तगण उपस्थित होते
दररोज कीर्तनासाठी उपस्थित असलेल्या भक्तां पैकी एक पुरुष व एक महिलेला नेरुळ तालुका अध्यक्ष श्री.गणेशदादा भगत यांच्या सौजन्याने माउली कुणासंगे ग्रंथ भेट देण्यात आले. दिंडी सोहळ्याचे अन्नदाते श्री अरुण थोरात,मच्छिन्द्र थोरात,आनंद भोसले हे होते तर काल्याचे अन्नदान /महाप्रसाद श्री.गणेशदादा भगत यांनी दिले
सप्ताह कार्यक्रमासाठी स्थानिक नगरसेविका सौ.रुपाली किस्मत भगत यांचे विशेष सहकार्य लाभले.सप्ताह अध्यक्ष-श्री चंद्रकांत वाफारे, सचिव-दिगंबर वायकर, खजिनदार-अरुण थोरात,सहसचिव- रामदास कराळे,सह खजिनदार-राजेंद्र कांबळे,कार्याध्यक्ष-श्री आनंदराव पवार,सहादु सुकाळे,शांताराम मातेले,गोरक्षनाथ गांडाल,गोरक्षनाथ वाफारे,शिवाजीराव पिंगळे,रमेश नार्वेकर,दिलीप खांडे,हनुमंत जगदाळे,
सदस्य-दिनकर फडतरे, अशोक गांडाल, संतोष शिंदे, कैलास चव्हाण, मंगेश काटकर, सूर्या पात्रा , संजय माने , संजय कुर्लेकर, बाबासाहेब रोकडे, अर्जुन जगदाळे, समाधान कांबळे , वसंत चव्हाण, अभिषेक हाडवळे,दीपक खरटमल,विठ्ठल भोईटे,मनोहर जाधव,वासुदेव पाटील, विकास तिकोने, धीरज सूर्यवंशी, राज तुरे, संजय पिंगळे, मन्सूर कोतवडेकर, विनय शेडगे, प्रमुख सल्लागार- राजेंद्र धनावडे, चंद्रकांत महाजन, सुनील गलांडे, शशिकांत जगताप, सुरेश बोराटे, गणेश सैद, अनंत कदम, प्रकाश मतकर, संभाजी पाटील, शशिकांत गोरड, सुनील कदम, तानाजी हांडे, सुजित जाधव, नवनाथ जेधे,विठ्ठल गांजवे, दिलीप सूर्यवंशी, तानाजी घोलप, धनंजय मतकर,सुरेश पाटील,जयवंत संकपाळ, भीमराव कांबळे, शिवाजीराव देसाई,संतोष पानमंद, तुकाराम थोरात,विनोद चाळके,उमाकांत राऊत,सत्यवान घाडी,गणेश काटकर, धनाजी कचरे,सुभाष शेवाळे,रवींद्र जाधव,पांडुरंग वाघोस्कर,मधुकर दराडे, अरविंद नारखडे सर, चांगदेव कोळेकर,सलीम मुलाणी, संजय गांडाल भाऊसाहेब सोबळे, मंगेश राऊत, कचरू बेलोटे, मिलिंद पवार, अशोक हाडवळे, अजय पाटील, प्रदीप शिंदे, मच्छिन्द्र थोरात, प्रदीप घाडगे, मंजाभाऊ औटी, सुहास सावंत ,जयकुमार ढमाले, मोहन खांडके यांनी विशेष मेहनत घेतली