सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसरात महापालिकेच्या तानाजी मालुसरे क्रिडांगणावर त्रिमूर्ती मित्र मंडळ आयोजित अखंड हरिनाम सप्ताहास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून व्यसनमुक्तीला समर्पित असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह गेल्या आठ वर्षापासून सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून आयोजित केला जात आहे.
ह.भ.प गुरूवर्य शाम महाराज खोडे (गायन विशारद) आणि ह.भ.प किसनराव आमले हे या सप्ताहाचे व्यासपिठ चालक असून ह.भ.प संदीपबुवा आमले, ह.भ.प उत्तम महाराज आवारे, ह.भ.प मारूती महाराज आमले, ह.भ.प बाळाराम महाराज पाटील,ह.भ.प राजाराम महाराज चतुर, ह.भ.प महादेव महाराज मोरे,ह.भ.प दिलीप महाराज शेलार, ह.भ.प भागवत महाराज झेंड, ह.भ.प नंदुबुवा शेळके आदी मंडळी गाथा पारायण या सप्ताहात करत आहेत.
ह.भ.प नामदेव महाराज मोरे व ह.भ.प सोपान महाराज जेजुरकर यांची प्रवचने झाली असून ह.भ.प केशव महाराज शिवणे, ह.भ.प विठ्ठल महाराज साबळे यांचे हरिकिर्तन झाले आहे. बुधवारी, २ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून गुरुवारी सकाळी १० ते १२ काल्याचे किर्तन व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती हरिनाम सप्ताहाच्या आयोजक असणाऱ्या सौ. संगिताताई दिलीप आमले यांनी दिली.