नवी मुंबई : नेरूळ सेक्टर १८ येथील शिवाजी महाराज चौकात पुलवामा येथील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी काळ्या फिती लावून हा दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत आपला संतापही व्यक्त केला.
या श्रध्दाजंली कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत, समाजसेवक भोजमल पाटील, सागर मोहिते, विकास तिकोने, चेतन मढवी, सुरेश नलावडे, रविंद्र गावांड, विकास औटी, विवेक पाटील, अक्षय काळे, आनंदराव पवार, शांताराम कुऱ्हाडे, शिवाजी पिंगळे, प्रवीण पाटील, किस्मत भगत, कुणाल सुर्वे, बालु हिंगे, सुदर्शन भोर, विट्ठल भोईटे, संजय गांडाल, यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.