नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामध्ये शनिवारी रात्री पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रध्दाजंली वाहण्यात आली. जाणता राजा तरूण मित्र मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपस्थितांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध करताना पाकिस्तान व पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाचा खात्मा करण्याबाबत आपला संताप व्यक्त केला.
या श्रध्दाजंली कार्यक्रमात महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती सौ. सुजाताताई सुरज पाटील, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सुरज पाटील, प्रभाग ८६च्या स्थानिक नगरसेविका सौ. जयश्री एकनाथ ठाकूर, महापालिका ‘ब’ प्रभाग समिती सदस्य मनोज यशवंत मेहेर, मनसेचे विभागप्रमुख-कामगार नेते अभिजित देसाई, भाजपचे स्थानिक वॉर्ड अध्यक्ष प्रदीप बुरकुल, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वॉर्ड अध्यक्ष महादेव पवार, तुकाराम टाव्हरे, शिवसेना शाखाप्रमुख दिलिप आमले, मनोज तांडेल यांच्यासह स्थानिक रहीवाशी व जाणता राजा तरूण मित्र मंडळाचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.