नवी मुंबई | योगेश शिंदे
काश्मिर येथिल पुलवामा भागात सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी व सर्व शहिदांना दिघा गावाच्या वतीने कँडल मार्च काढून भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. दिघा पूर्व येथून कँडल मार्चला सुरवात झाली व दिघा तलावा पर्यत मार्च काढण्यात आला. यावेळी शहीद झालेल्या जवानांप्रती असलेल्या भावना व्यक्त केल्या. पाकिस्तानला आता धडा शिकवाच, अशी मागणी दिघा गावातील नागरिकांनी व्यक्त केली.
यावेळी नगरसेवक श्री.नवीन गवते ,नगरसेविका सौ.दिपा गवते ,समाजसेवक श्री.राजेश गवते ,मागासवर्गीय सेलचे जिल्हाअध्यक्ष श्री.अभंग शिंदे ,परिवहन सदस्य श्री.विरेश सिंग ,प्रभाग समिती सदस्य श्री.दामोदर कोटीयन ,श्री.करण पार्छे ,कु.योगेश शिंदे ,कु.सुमित यादव कु. सुरज नायर ,कु.हरी ड्डवाल,कु.मनीष पार्छे ,श्री.प्रकाश अनचन आदीसह अनेक पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.