राजेंद्र पाटील
पनवेल : महाराष्ट्रातील पहिला महिला रिक्षा थांबा गतवर्षी नवीन पनवेल शहरातील डी मार्ट समोर सुरु कऱण्यात आला. शुक्रवार दिनांक ०८ मार्च रोजी महिला दिनानिमित्त या रिक्षा थांबायला एक वर्ष पूर्ण होत आहे. या संघटनेत त्यावेळी असणाऱ्या २० रिक्षांची संख्या आज ८५ च्या घरात पोहोचली असून त्या अनुषंगाने महिलांच्या संघटनेमार्फत शुक्रवारी (०८ मार्च ) सकाळी १० वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळ्याचे डी- मार्ट जवळील मैदानात करण्यात आलेले आहे.
या सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार आमदार प्रशांत ठाकूर, पनवेलच्या महापौर डॉ.कविता चौतमोल, पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, पनवेलचे तहसीलदार अमित सानप, पालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर, लावणी सम्राट विजया पालव, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध आगरी गायक जगदीश पाटील, आपला भगवा वृत्तपत्राच्या मुख्य संपादिका सारिका शिंदे यांच्यासह पनवेल, कळंबोली वाहतूक शाखेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रथम वर्धापनदिनानिमित्त सर्व महिला रिक्षा चालकांमार्फत पर्यावरण, मुलगी वाचवा मुलगी शिकवा तसेच रस्ता सुरक्षा या विषयावर भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, सुप्रसिद्ध लावणी सम्राट सौ. विजया पालव, रायगड जिल्ह्यातील पहिली रिक्षा चालक महिला शालिनीताई गुरव, पनवेल फास्टच्या पत्रकार ऋतुजा महामुनी, दैनिक लोकसत्ताच्या प्रतिनिधी सिमा भोईर, नवी मुंबई आवाज वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधी श्वेता भोईर, आपला भगवा वृत्तपत्राच्या मुख्य संपादिका सारिका शिदे, निल हॉस्पिटलच्या डॉक्टर शुभदा निल यांच्यासह सर्व अबोली महिला रिक्षा चालकांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे.
यावेळी राबविण्यात येणाऱ्या वर्षपूर्ती कार्यक्रमाचे आयोजक अबोली रिक्षा चालक मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा पत्रकार संतोष भगत, उपाध्यक्षा सौ.शालिनी गुरव, सचिव विलास मोरे, खजिनदार ललिता राऊत, अश्विनी शितोले, सीमा नरबळे, ज्योती पिसाळ, वर्षा धरणे, जयश्री देशमुख, रेश्मा प्र. सोनी, मनिषा लकड़े, माधुरी कोळी, मनिषा देशमुख, वर्षा राजगुडे, तेजल जाधव, अर्चना पवार, विध्या पालकर, कल्पना सरळे, आशा घालणे, अरुणा धस, रेश्मा सोनी, भारती निगडूसे, सुनिता जाधव, मंगल पाटील, भारती श्रीराम, स्वाती गावडे, सविता सरवदे, आशा तगड, वृशाली रोजगे, इंदुमती बगारे, रोहिणी राजदेव, सुगंधा धबे, अनिता पाटील, सुनिता पवार आदीं महिला उपस्थित राहणार आहेत. यावेळी कार्यक्रमासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सौ. हेमांगीनी पाटील, सुशांक केणी, दैनिक लोकमतचे पत्रकार मयूर तांबडे यांचे विशेष सहकार्य लाभत असल्याचे संतोष भगत यांनी सांगितले. यावेळी संघटनेत सहभागी असलेल्या ८५ महिला रिक्षाचालकांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी सदगुरू ऑटो पनवेल यांच्याकडून या महिलांना अबोली ऍप्रॉन तसेच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांच्या तर्फे सर्व महिलांना वैद्यकीय विम्याची (मेडिकल पॉलिसी) व्यवस्था करण्यात आली आहे.