अक्षय काळे
नवी मुंबई : जागतिक महिला दिनानिमित्त नेरूळ सेक्टर सहा परिसरातील अंकिता मोटर ट्रेनिंग स्कूल व त्रिमूर्ती महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबईतील महिलांना ना नफा, ना तोटा या तत्वावर कार चालविण्याचे ट्रेनिंग प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती अंकिता मोटर ट्रेनिंगच्या संचालिका सौ. संगिता दिलीप आमले यांनी दिली.
अवघ्या २५०० रूपयांमध्ये महिलांना हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याबाबत इच्छूक महिलांनी ९९३०७८०५३४/९१३६१८३३५६ या क्रमाकांवर नाव अधिक माहितीसाठी संपर्क साधावा असे संगिता आमले यांनी कळविले आहे.