राजेंद्र पाटील
पनवेल : रायगड बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन यांच्या वतीने आणि महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या मान्यतेने डॉ. संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दिनांक १० मार्च रोजी सायंकाळी ६. ३० वाजता कामोठे येथे ‘आमदार चषक रायगड श्री २०१९’ रायगड जिल्हा अजिंक्यपद शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेतून रायगड जिल्ह्याचा संघ निवडून १६ मार्चला बुलढाणा येथे होणाऱ्या ‘महाराष्ट्र श्री २०१९’ या स्पर्धेसाठी पात्र करण्यात येणार आहे. कामोठे पोलीस ठाण्याजवळील मैदानात होणारी आमदार चषक स्पर्धा मेन फिजिक खुला, ५५, ६०, ६५, ७० किलो खालील आणि ७० किलोवरील खुला गट अशी होणार असून किताब विजेत्यास ५१ हजार रुपये, मनाचा पट्टा, चषक देण्यात येणार आहे. बेस्ट पोझर, मोस्ट इम्प्रोमेन्ट तसेच विविध गटातील स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर निवड झालेल्या स्पर्धकाला ट्रॅक सूट आणि सर्व सहभागी स्पधकाला चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. रायगड संघाचे प्रशिक्षक व जिल्हा सचिव दिनेश शेळके आणि जिल्हा कार्याध्यक्ष मारुती आडकर हे स्पर्धेची जय्यत तयारी करत आहेत.