अनंतकुमार गवई
नवी मुंबई : नेरूळ प्रभाग क्रमांक ९६ मधील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत या प्रभागातील नेरूळ सेक्टर १६ ए परिसरात गटर, महानगर गॅसचे काम सुरू असताना केलेल्या खोदकामाची व पथदिव्याची पाहणी करत आहेत. प्रभागातील समस्यांबाबत महापालिका प्रशासनाकडून कामे मंजूर करवून घेणे आणि त्यानंतर सुरू असलेल्या कामाची व कामाच्या दर्जाची पाहणी करणे व कामामुळे लोकांची गैरसोय होत आहे अथवा नाही याबाबत स्थानिक रहीवाशांशी चर्चा करणे या कार्यप्रणालीमुळे नगरसेविका रूपाली भगत या स्थानिक भागातच नाही तर नेरूळ नोडमध्येही चर्चेचा विषय बनल्या आहेत. गेल्या १० वर्षापासून गटारे मातीमुळे तुंबलेली होती. गटारांची सफाई करताना मातीचे ढिगारे मोठ्या प्रमाणात काढावे लागले. नादुरूस्त पथदीव्यांची प्रथमच दुरूस्ती झाल्यामुळे परिसरात उजेड झाल्याचे समाधान स्थानिक भागातील रहीवाशांकडून व्यक्त केले जात आहे.