स्वयंम न्यूज ब्युरो
नवी मुंबई : खासदार राजन विचारे यांच्या पाठपुराव्यामुळे नवी मुंबई मधील वाशी पोस्ट ऑफिस मध्ये पहिल्या माळ्यावर नवी मुंबईकरांसाठी पासपोर्ट कार्यालयाचे उद्घाटन झाले. नवी मुंबईकरांच्या मागणी नुसार आता नवी मुंबईकरांना हक्काचे पासपोर्ट कार्यालय खासदार राजन विचारे यांच्यामुळे मिळाले आहे. नवी मुंबईकरांना पासपोर्ट काढण्यासाठी ठाणे किंवा मुंबईला पायपीट करावी लागायची आणि त्यामुळे त्यांचा वेळ खर्ची व्हायचा तसेच त्यांच्या कामाचे खाडे व्हायचे या सर्वातून मार्ग काढला आहे. आता नवी मुंबईकरांची हेलपाटे वाचणार आहेत ते फक्त खासदार राजन विचारे यांच्या मुळेच.
या पासपोर्ट ऑफिस चा फायदा ऐरोली ते पनवेल मध्ये राहणाऱ्या सर्व रहिवाशांना होणार आहे.पासपोर्ट कार्यालयाच्या मान्यतेसाठी खासदार राजन विचारे यांनी पासपोर्ट अधिकाऱ्यांशी वारंवार चर्चा केली.
या उद्घाटनाच्या वेळेस ठाणे लोकसभा खासदार राजन विचारे, जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर ,नगरसेवक राजेश शिंदे, नगरसेवक नामदेव भगत, नगरसेवक ममित चौघुले, नगरसेवक करण मढवी, उपजिल्हा प्रमुख दिलीप घोडेकर, शहर प्रमुख विजय माने, जितेंद्र कांबळे, कोकणी सुन्नी मुसलमान संघटनेचे अध्यक्ष सलीम भाई, व इतर पदाधिकारी तसेच वाशी पोस्ट ऑफिसचे अधीक्षक अजयकुमार सिंघ, पासपोर्ट अधिकारी विजय कुमार नायर, आदि उपस्थित होते.