अनंतकुमार गवई
नवी मुंबई : महापालिका प्रभाग 87 मधील नेरूळ सेक्टर 8 परिसरातील महापालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज उद्यानात खासदार निधीतून करण्यात आलेल्या सुशोभीकरणाचे लोकार्पण खासदार राजन विचारेंच्या हस्ते शनिवारी रात्री करण्यात आले.
या कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, उपजिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर, शहरप्रमुख विजय माने, महिला शहर संघटक सौ. रोहिणी भोईर, नगरसेवक एम.के.मढवी, करण मढवी, विभागप्रमुख रतन नामदेव मांडवे, कृष्णा धुमाळ, उपविभागप्रमुख अशोक येवलेे, संतोष थोरात, दिपक शिंदे, शाखाप्रमुख गणेश कुलकर्णी, अरविंद जाधव, राजेश पुजारी, युवा सेनेचे बेलापुर विधानसभा अधिकारी मयुर ब्रीद, उपअधिकारी निखिल मांडवे, युवा सेनेचे स्थानिक शाखाधिकारी सुनील सानप, संजय घोडेकर, अमर जाधव, राहूल जगदाळे आदी उपस्थित होते.
रात्री उशिरा खासदार राजन विचारे लोर्कापण सोहळ्यासाठी आलेे असताना स्थानिक रहीवाशी मोठ्या संंख्येेेने उपस्थित होेते. यावेळी जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, उपजिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर, शहरप्रमुख विजय माने यांची भाषणे झाली. संबंधितांनी आपल्या भाषणातून प्रभागाच्या विकासासाठी मांडवे परिवार करत असलेल्या परिश्रमाची प्रशंसा केली. शिवसेना विभागप्रमुख व माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवे यांनी आपल्या भाषणातून परिसरातील समस्यांचा व सुविधांचा आढावा घेेताना स्थानिक रहीवाशी करत असलेेल्या सहकार्याचाही उल्लेख केला. उद्यानासाठी निधी मागताच खासदार विचारे यांनी निधी उपलब्ध करून दिल्याविषयी मांडवे यांनी त्यांचे आभार मानलेे. स्थानिक नगरसेविका व कार्यक्रमाच्या आयोजिका सौ. सुनिता मांडवे यांंनी प्रभागात झालेेल्या व सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेताना मतदारांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी पालिका प्रशासनाकडे आपण सतत पाठपुरावा करत असल्याचे सांगितलेे.
खासदार राजन विचारे यांनी आपल्या भाषणातून विकासकामासाठी आपण जो निधी मागेल त्याला देण्याचे धोरण अवलंबलेे आहेे. जनतेच्या कामांंना निधी नसल्याचा अडथळा निमार्र्ण होवू नये असे सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पादचारी पुलाची समस्या मांडवेंनी निदर्शनास आणून देताच आपण या ठिकाणी पाहणी करून काम करण्याचे निर्देशही संबंधितांना दिलेे असल्याचे सांगताना आपण नवी मुंबईत केलेेल्या कामांचा आढावाही खा. राजन विचारे यांनी आपल्या छोटेखानी भाषणातून घेतला.
या कार्यक्रमासाठी शंकर पडवळ, सागर शिंदे, राठोड, इथपे, गौतम शिरवाळे, तुकाराम शिंदे, सदानंद भुवड, अनुभव बेळे , मंगेश शिवतरकर, सौ. जयश्री बेळे, सौ. शुभांगी परब, सौ. स्मिता शिवतरकर, सौ. पेडणेेकर, सौ. चव्हाण आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात खासदार विचारेंच्या हस्ते परिसरातील संजीवनी महिला भजन सांस्कृतिक मंडळाचाही सत्कार करण्यात आला.