अनंतकुमार गवई
नवी मुंबई : अनेकदा समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज नसल्याने अपघात होतात . ‘कॉन्व्हेक्स मिरर‘ हा अपघात टाळण्यासाठी अभिनव उपक्रम लोकोपयोगी ठरत असल्याचे पाहून समाजसेवक रवींद्र भगत यांनी नेरूळ सेक्टर १६ परिसरात एका ठिकाणी अपघात टाळण्यासाठी ‘कॉन्व्हेक्स मिरर‘ स्वखर्चाने बसविले आहेत.
नेरुळ सेक्टर-१६ येथे श्री सागरदर्शन सोसायटीच्या दिशेकडून येणाऱ्या आणि अष्टविनायक सोसायटी कडून येणाऱ्या वाहनांना सन शाईन हॉस्पिटल च्या वळणावर समोरील वाहने दिसण्याकरिता आणि वाहनचालकांना सतर्क करण्यासाठी स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार समाजसेवक रविंद्र भगत यांच्या वतीने ”कॉन्व्हेक्स मिरर” लावण्यात आला. यामुळे सदर ठिकाणी अपघात टळण्यास मदत होणार आहे.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुकाध्यक्ष व समाजसेवक गणेशदादा भगत, आनंदराव पवार, गोरक्षनाथ गांडाल, सागर मोहिते, सखाराम जांभळे, अशोक गांडाळ, प्रकाश पाटोळे, राजेश घाडी, मन्सूर कोतवडेकर, सुभाष यादव, बंटी कांबळे उपस्थित होते.