अॅड. महेश जाधव
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसरात भगवती महिला मंडळाच्या वतीने २३ मार्च रोजी नेरूळ सेक्टर सहा परिसरात शिवजंयती उत्सव व हळदीकुंकु समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
सांयकाळी ६ ते १० या वेळेत नेरूळ सेक्टर सहामधील हिमालय व वरूणा सोसायटीमधील क्रिडांगणावर या समारंभाचे आयोजन करण्यात आले असून समाजसेवक प्रल्हाद नारायण पाटील व भगवती महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. समुद्राताई प्रल्हाद पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याच कार्यक्रमात ‘स्वर मेलोडी’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. संदीप कोटीयन हे या शिवजंयती उत्सव कमिटीचे अध्यक्ष असून इमरान नाईक, सुनील पाटील, बबन पाटील हे उपाध्यक्ष, हनुमंत साळुंके, मनोज जैन, अनिल पाटील हे सचिव, अजित खताळ, राजू आहेर हे सहसचिव, मनोज तांडेल, सुखदेव पाटील हे खजिनदार तर सोमनाथ शिंदे, गुरूनाथ पाटील हे सहखजिनदार आहेत. दिलीप किसनराव आमले हे या कार्यक्रमाचे प्रमुख सल्लागार असून शरद गोडवे, गोवर्धन म्हात्रे हे या कार्यक्रमाचे सहसल्लागार आहे.
सारसोळे व कुकशेत गावच्या ग्रामस्थांनी आणि नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक प्रल्हाद पाटील, सौ. समुद्राताई पाटील यांनी संयुक्तपणे केले आहे.