रवींद्र भगत यांंनी स्वखर्चाने पाण्याचा टॅकर आणून झाडांना घातले पाणी
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर 26 मधील श्री बामनदेव झोटींगदेव मैदानात असलेेल्या झाडांना उन्हाळ्याच्या दिवसात जगविण्यासाठी महापालिका प्रशासनाने पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी समाजसेवक रवींद्र भगत यांनी महापालिका आयुक्त एन रामास्वामी, उद्यान विभागाचे उपायुक्त तसेच बी विभाग अधिकारी यांना लेखी निवेदनातून केली आहेे.
नेरुळ सेक्टर-26 येथील श्री बामणदेव झोटिंगदेव मैदानामध्ये महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने तसेच सामाजिक संस्था आणि वृक्षप्रेमींनी वृक्षरोपण केलेले आहे. सध्या उन्हाळा सुरु झाला असून आताच कडाक्याचे उन पडत आहे पाण्याअभावी मैदानातील झाडे सुकत चालली आहेत. सुकत चाललेली झाडे हे एक वृक्षप्रेमी म्हणून मनाला त्रासदायक बाब वाटत आहे. त्यामुळे समस्यचे गांभीर्य लक्षात घेऊन झाडे जगविण्यासाठी महापालिका प्रशासनाने सदर ठिकाणी पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून त्या झाडांना पाणी देण्यासाठी कर्मचारी वर्गही उपलब्ध करण्याची मागणी समाजसेवक रविंद्र भगत यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. एन रामास्वामी, उपायुक्त (उद्यान विभाग ) आणि बी-विभाग अधिकारी नेरुळ यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. महापालिका प्रशासनाकडे लेखी मागणी करून तत्परतेने समाजसेवक रविंद्र भगत यांनी स्वखर्चाने पाण्याचा टँकर मागवून मैदानातील आंबे आणि नारळाच्या झाडांना पाणी दिले. त्यावेळी त्यांच्यासोबत समाजसेवक अशोक गांडाल, अमर मोरे उपस्थित होते.