अक्षय काळे
नवी मुंबई : नेरुळ प्रभाग क्रमांक-९६ मधील स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार नगरसेविका सौ.रुपाली किस्मत भगत यांनी महापालिका प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करत प्रभागातील सेक्टर मधील अंतर्गत भागातील विद्युत पोलवर महापालिकेतर्फे एलईडी दिवे बसविण्याचे काम मंजूर करून घेतले . त्या नुसार विद्युतपोलवर एलईडी विद्युत दिवे बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली.
या अगोदर प्रभागातील विद्युत पोलवरील विद्युतदिव्यांची दुरावस्था झाली होती. स्थानिक रहीवाशांना अंधाराचा सामना करावा लागत होता. या समस्यमुळे येथील नागरिकांना विविध प्रकारचा त्रास सहन करावा लागत होता. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रभागातील स्थानिक कार्यसम्राट नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत यांनी महापालिका प्रशासनाकडे नेरुळ प्रभाग-९६ परिसरात एलईडी विद्युत दिवे बसविण्यात यावी अशी मागणी करत त्याबाबत पाठपुरावा सुरु ठेवला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन प्रभागात महापालिकेतर्फे विद्युत पोलवर एलईडी दिवे व फ्लड लाईट बसविण्याच्या कामाला मंजुरी मिळाली होती. त्यानुसार प्रभागातील तब्बल ६० एलईडी दिवे बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली असून परिसरातील अंधाराचे साम्राज्य दूर होऊन एलईडी दिव्यामुळे पडणाऱ्या लख्ख प्रकाशामुळे परिसर प्रकाशाने उजळून निघाला आहे.
त्यामुळे स्थानिक नागरिकांनी नगरसेविका रुपाली किस्मत भगत यांचे विशेष कौतुक करून त्यांच्या नागरी विकास कामांबाबत समाधान व्यक्त केले. गणेश भगत व रूपाली भगत यांच्या माध्यमातून प्रभागातील समस्यांचे निवारण होवून या ठिकाणी सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होवू लागल्याची प्रतिक्रिया स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
विद्युत पोलवर एलईडी विद्युत दिवे बसविण्याचे काम सुरु असताना स्वतः नगरसेविका रुपाली किस्मत भगत,नेरुळ तालुकाध्यक्ष गणेश भगत, समाजसेवक संजय पाथरे, अनंत कदम, आनंदराव पवार, शांताराम कुऱ्हाडे, गोरक्षनाथ गांडाल, चंद्रकांत महाजन, सागर मोहिते, रविंद्र भगत उपस्थित होते.