स्वयंम न्यूज ब्युरो
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व प्रभाग क्रं ८५ मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविकास सौ. सुजाताताई सुरज पाटील यांच्या प्रभागात ७ मार्च रोजी सांयकाळी ६ वाजता विविध नागरी कामांचा शुभारंभ होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार उपस्थित राहणार आहेत.
२ कोटी ५६ लाख रूपयांचा निधी खर्च करून प्रभागात पदपथ व गटारांचे काम केले जाणार असून ३० लाख रूपयांचा निधी खर्च करून सारसोळे गावातील महापालिका शाळा क्रं १२ चे नुतनीकरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास स्थानिक रहीवाशांनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सभापती सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी केले आहे.