नवी मुंबई : नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाला अटक करण्यात आली आहे. बलात्कार प्रकरणी दिघा येथील माजी नगरसेवक राम आशिष यादव याला अटक केली. रबाळे एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यादव याला कोर्टामध्ये हजर केले असता १० एप्रिलपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
राम आशिष यादव या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकावर दिघा येथे राहणाऱ्या एका शिक्षिकेने बलात्काराचा आरोप केला होता. याप्रकरणी तिने रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पीडित शिक्षिकेच्या तक्रारीनुसार रबाळे एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी यादव याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी यादवला अटक करुन कोर्टात हजर केले असता त्याला कोर्टाने १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
यादव याने पीडित शिक्षिकेचे अश्लील फोटो काढले होते. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्याने अनेकदा माझ्यावर बलात्कार केला असल्याचे पीडित शिक्षिकेने तक्रारीमध्ये म्हटले आहे. धमकी देत गेल्या अनेक महिन्यापासून यादव शिक्षेकेला ब्लॅकमेल करत होता. या सगळ्याला कंटाळून अखेर या शिक्षिकेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी तिने रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. दरम्यान, या राष्ट्रवादी काँग्रेसच्या या माजी नगरसेवकाची आसपासच्या परिसरामध्ये खूप दहशत असल्याचे देखील सांगितले जात आहे.
‘झोपडपट्टी माफिया’ म्हणून ओळख असलेल्या रामआशीष यादवची यादवनगरमध्ये दहशत असून तो माजी नगरसेवक आहे. पीडित महिला शिक्षणक्षेत्राशी संबंधित असून यादवने पीडितेचा व्हिडीओ तयार केला. तो प्रसारित करण्याची धमकी देऊन तो या तरुणींचे गेल्या दोन वर्षांपासून लैंगिक शोषण करीत असल्याचा आरोप पीडित युवतीने केला आहे.
मात्र हा त्रास असहाय झाल्यानंतर या तरुणीने अखेर रबाळे एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले आणि यादवच्या विरोधात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून यादवला अटक केली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी दिली.