नवी मुंबई : नेरूळ पश्चिम परिसरात राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रचारात आघाडी घेतली असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुकाध्यक्ष गणेश भगत यांच्या नेतृत्वाखाली घरटी प्रचारावर भर दिला जात आहे. प्रभाग ९६ व ९७ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने घरटी प्रचारावर भर देण्यास सुरूवात केल्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराच्या तुलनेत राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रचारात आघाडी घेतली आहे.
नेरूळ सेक्टर १६,१८ व २४ परिसरात राष्ट्रवादी कॉंग्रेसने तालुकाध्यक्ष गणेश भगत यांच्या नेतृत्वाखाली घरटी प्रचारावर भर देण्यास सुरूवात करत परिसर पिंजून काढला आहे. गणेश भगत यांच्यासमवेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत , प्राजक्ता प्रभू, विमल गांडाल, सुरेखा देठे, संजय पाथरे, सोमनाथ बारवे, सुभाष घाडी, नाना घोगरे, शशिकांत विन्हेरकर, अशोक गांडाल, अशोक पिंगळे, पांडुरंग बेलापुरकर, विष्णू देठे, गोरक्षनाथ गांडाल, शांताराम मातेले, विट्ठल भोईटे, हरीशचंद्र पातेरे, एस.पी. गवस, आनंद क़दम, शांताराम क़ुऱ्हाडे, सुरेश नलावडे, सुरेश ठाकुर, विकास तिकोणे, प्रतीक पाटोले, मनसुर कोतवड़ेकर, सूर्या पात्रा, संतोष चाळके, आनंदराव पवार, संतोष शिंदे, सिताराम देसाई, संतोष पाटील, रमेश नार्वेकर, सागर मोहिते, राजेश घाडी, सुभाष यादव, मल्हार मानकुमरे, रोहित चव्हाण आदी प्रचारात सहभागी झाले आहेत.