स्वयंम न्यूज ब्युरो
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व प्रभाग ८५ मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील यांच्या हस्ते नेरूळ सेक्टर सहा, सारसोळे गाव व कुकशेत गावातील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा घरोघरी जावून सत्कार करण्यात आला.
सभापती सुजाता पाटील या स्वत: उच्चविद्याविभूषित असून वाणिज्य शाखेच्या त्या द्विपदवीधर आहेत. विविध विषयावर त्यांचा प्रभाव असून सामाजिक बांधिलकी, समाजोपयोगी उपक्रम आदी कार्यक्रमात त्यांचा असणारा सक्रिय सहभाग त्यांच्यातील संवेदनशील भावनेचा प्रत्यय आणून देत असतो. गेल्या काही वर्षापासून सभापती सुजाता पाटील दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा घरोघरी जावून सत्कार करत असतात. शुक्रवारपासून त्यांनी गुणवंतांचा गुणगौरव अभियान राबविण्यास सुरूवात केली आहे. त्यांच्यासमवेत प्रभाग ८६ मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सौ. जयश्री एकनाथ ठाकूर, समाजसेविका भारती टाव्हरे, मनिषा लगाडे, सीमा चौधरी आदी अभियानात सहभागी झाल्या होत्या.
**************
वर्षभर अभ्यास करून विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाचे कौतुक करणे, त्यांना प्रोत्साहीत करणे यासाठी दरवर्षी गुणवंतांचा गुणगौरव केला जातो. विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांच्या पालकांचा, गुरूजनांच्या परिश्रमाचा तितकाच वाटा असतो. गुणगौरव करण्यासोबत संबंधित विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या भावी वाटचालीस मार्गदर्शन करण्यावरही भर दिला जातो. त्यासोबत पुढील वाटचालीत त्यांची वाढणारी जबाबदारी याचीही जाणिव विद्यार्थ्याना करून देत असतो. विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळाल्यावर त्यांचा हुरूप वाढत असल्याने हे कार्यक्रम यापुढील काळातही राबविले जाणार आहेत.
- सौ. सुजाता सुरज पाटील
- सभापती :- महिला व बालकल्याण समिती
- नवी मुंबई महानगरपालिका