स्वयंम न्यूज ब्युरो
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर 4 मधील पालिका विभाग कार्यालयासमोरील महापालिकेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस उद्यानात सीसीटीव्ही व पूर्णवेळ सुरक्षा रक्षकाची मागणी करताना सारसोळेचे भूमीपुत्र व महापालिका ब प्रभाग समिती सदस्य मनोज मेेहेर यांनी भविष्यात या उद्यानात दुर्घटना घडल्यास महापालिका प्रशासन जबाबदार राहील असा सज्जड इशारा महापालिका प्र्रशासनाला दिला आहेे.
महापालिका विभाग कार्यालयासमोरच नेरूळ सेक्टर चार परिसरात महापालिकेचे उद्यान व क्रिडांगण आहे. काही वेळापूर्वीच दुपारी 3.15 वाजण्याच्या सुमारास विभाग कार्यालयासमोरील उद्यानात युवकांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाली. उद्यानात बसलेल्या चार जणांना मारण्यासाठी बाहेरून युवकांचा 60 ते 70 च्या संख्येनेे जमाव आला होता. सुमारे 15 मिनिटे हा हाणामारीचा प्रकार सुरु होता. विशेष म्हणजे यावेळी उद्यानात यावेळी पालिका प्रशासनाचा एकही सुरक्षा रक्षक उपलब्ध नव्हता. उद्यानात पूर्णवेळ सुरक्षा रक्षक व सीसीटीव्ही असणे आवश्यक आहेे. या उद्यानात सकाळपासून सांयकाळपर्यत प्रेमी युगलेही बसलेली असतात, अनेकदा त्यांच्यात नको ते अश्लिल चाळेही होत असतात. रात्री अंधार पडल्यावर उद्यानाचा ताबा गर्दुल्यांनी घेतलेेला पहावयास मिळतो. या उद्यानात हाणामारीच्या घटना, प्रेमी युगलांचे अश्लिल चाळे आणि रात्री गर्दुल्यांचा उपद्रव पाहता उद्यानाची वेळ निश्चित करावी व त्यावेळी सुरक्षा रक्षक उपलब्ध असणे आवश्यक आहेे. उद्यानात सीसीटीव्ही यंत्रणा बसविल्यास कायदा व सुव्यवस्थेलाही ते हातभार लावण्यासाठी उपयुक्त ठरेल. समस्येचे गांभीर्य व आमच्या म्हणण्यामागील कळकळ आपण लक्षात घेवून आमच्या मागणीला लवकरात लवकर न्याय द्याल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. उद्या आमच्या मागणीला केराची टोपली दाखवित कानाडोळा केेल्यास आणि दुर्घटना घडल्यास त्यास सर्वस्वी महापालिका प्रशासनच जबाबदार राहील असा इशारा मनोज मेेहेेर यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.