नवी मुंबई : नेरूळ पूर्व आणि पश्चिमेला जोडणार्या रेल्वे रूळावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पादचारी पुलाचे काम पूर्ण होईपर्यत नेरूळ पूर्व आणि पश्चिम परिसराकरता महापालिका प्रशासनाने रिंग रूट बससेवा सुरू करावी आणि जनतेला ही बससेवा पुल पूर्ण होईपर्यत मोफत असावी अशी मागणी शिवसेनेच्या प्रभाग 87च्या नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी महासभेदरम्यान महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
नेरूळ पूर्व आणि पश्चिमला जोडणार्या रेल्वे रूळावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पादचारी पुल महापालिका प्रशासनाने धोकादायक असल्याचे सांगत नुकताच बंद केला आहे. यामुळे नेरूळ पूर्व आणि पश्चिमच्या रहीवाशांचे हाल होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी महासभेदरम्यान या समस्येकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधत रिंगरूट बससेवेची उपलब्धता आणि मोफत प्रवासाची मागणी केली आहेे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पादचारी पुलाची दुरावस्था व धोकादायक स्थिती पाहता नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी गेल्या साडे चार वर्षात महापालिका प्रशासनाकडे केला होता. त्यापूर्वी त्यांचे यजमान व तत्कालीन नगरसेवक रतन नामदेव मांडवे यांनीही या पुलाच्या दुरावस्थेबाबत महापालिका व रेल्वे अधिकार्यांच्या भेटी घेत समस्येचे गांभीर्य निदर्शनास आणून दिलेे होेते.
नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांच्या पाठपुराव्यानंतर महापालिका प्रशासनाने या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट एक वर्षापूर्वी केलेे होते व पादचारी पुल धोकादायक असल्याचे सांगत काही दिवसापूर्वीच पुल बंद केला. परंतु नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिटबाबत महापालिकेकडे 2016लाच मागणी केली होती. तथापि नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर शिवसेना खासदार राजन विचारे यांनीही रेल्वे अधिकारी, महापालिका अधिकारी यांच्यासमवेत या पुलाची पाहणी केली होती.
नेरूळ पूर्व आणि पश्चिम यांना जोडणारा हा पादचारी पुल बंद केल्यामुळे पूर्व आणि पश्चिम येथील रहीवाशांची, शालेय व महाविद्यालयीन मुलांची, ज्येष्ठ नागरिकांची प्रचंड गैरसोय होेत आहे. त्यांना नेरूळ रेल्वे स्टेशन अथवा राजीव गांधी उड्डाण पुलालगतचा पादचारी पुल येथून ये-जा करावी लागत आहेे. तसेच पायी चालणे शक्य नसल्यास खिशाला झळ पोहोचून रिक्षाचा प्रवास करावा लागत असल्याची माहिती शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी दिली.
याप्रकरणी रहीवाशांना होत असलेल्या समस्येचे व गैरसोयीचे गांभीर्य शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे महासभेदरम्यान सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलेे. पालिका प्रशासनाकडे पुलाचे बांधकाम कधी सुरू होणार व कधी पूर्ण होणार, याबाबत महापालिका प्रशासनाने सिडको, रेल्वेकडे पत्रव्यवहार व काय पाठपुरावा केला आहे याबाबत नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी विचारणा केली. पालिका प्रशासनाने कार्यवाही सुरू असूून लवकरच कामाला सुरूवात होईल असे महासभेदरम्यान आश्वासन दिलेे.
पादचारी पुल बंद असल्याने रहीवाशांची, ज्येष्ठ नागरिकांची, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्याची गैरसोय होत असल्याने रिंगरूट बससेवेची व मोफत प्रवासाची मागणी नगरसेविका सौ. मांडवे यांनी प्रशासनाकडे लावून धरली. यावर महापौर जयवंत सुतार यांनीही पुलाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिलेे.