अक्षय काळे
नवी मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने शनिवार, दि. ६ जुलै रोजी बेकायदेशीर पार्किंग शुल्क उकळणाऱ्या इर्नाबिट मॉलच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे लोकसभा युवक अध्यक्ष यशपाल ओहोळ यांनी दिली आहे. सदर आंदोलनास मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा अध्यक्ष सिद्राम ओहोळ उपस्थित राहणार आहेत.
बांधकाम नियंत्रण नियमावलीतील तरतुदी नुसार पार्किंगची जागा आरेखित केलेली आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४४९ चे कलम २ (५०) अनुसार पार्किंगची जागा ही सार्वजनिक आहे या पार्किंगच्या जागेचा वापर शॉपिंग मॉल्स, मल्टीप्लेक्स यात येणाऱ्या ग्राहकांना वापरण्याचा कायदेशीर अधिकार आहे. उच्च न्यायालयानेही त्या बाबत आदेश दिलेले आहेत.
असे असताना इर्नाबिट मॉलकडून बेकायदेशीर रित्या टू-विलर २० रुपये व फोर-विलर ४० रुपये असे काही तासांसाठी घेतले जाते व लाखो रुपयांची लूट इर्नाबिट मॉल करताना दिसते त्यामुळे बेकायदेशीर रित्या पार्किंग शुल्क बंद करावी व सर्व ग्राहकांना मोफत पार्किंग उपलब्ध व्हावे यासाठी तिव्र निदर्शने छेडण्यात येणार असल्याची माहिती यशपाल ओहोळ यांनी दिली.