सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या २० व्या वर्धापनदिनाचे निमित्ताने प्रभाग क्रं ९८ व प्रभाग क्रं १०९ मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून स्थानिक रहीवाशांना दाखले वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम उत्साहात पार पडला असून ३५०हून अधिक लोकांनी या शिबराचा लाभ घेतला असल्याची माहिती प्रभाग १०९ चे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक व माजी उपमहापौर अशोक गावडे यांनी दिली.
१४ जुलै रोजी प्रभाग १०९ मधील सिवूडस येथील सेक्टर ४४ च्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात व प्रभाग ९८मधील नेरूळ सेक्टर २८ मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात आयोजित शिबिरात पॅनकार्ड, आधारकार्ड, सिनिअर सिटीझन ओळखपत्र , राष्ट्रीयत्व, वय अधिवास दाखला, रहिवाशी दाखला , उत्पनाचा दाखला , नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र आदी प्रमाणपत्राचे वितरण स्थानिक रहीवाशांना करण्यात आले. ३५० हून अधिक स्थानिक रहीवाशांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. संबंधितांना दाखले वाटप व अन्य शासकीय कागदपत्रांचे वितरण माजी उपमहापौर अशोक गावडे व नगरसेवका अॅड. सौ. सपना गावडे-गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.