सुवर्णा खांडगेपाटील : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई:- श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या वतीने रविवार , दि.२८ जुलै २०१९ रोजी सीबीडी बेलापूर सेक्टर- ३ ए येथील “वारकरी भवन” मध्ये बेलापूर विधानसभा क्षेत्रातील महिलांसाठी “मंगळागौरी महिला महोत्सव” कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महिलांमधील विविध सुप्त कलागुणांना वाव मिळावा, आपली संस्कृती-परंपरा जपली जावी, याकरिता सदर महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले असून महिलांसाठी आनंदाची पर्वणी आहे. नृत्य, संगीत, शृंगार, पारंपारिक वेशभूषा, मंगळागौरी जागर, भोंडला, कला सादरीकरण (नाट्य) इत्यादी कलागुणांचे संपूर्ण दिवसभर सादरीकरण करण्यात येणार असून महिलांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर कार्यक्रम दोन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात सकाळी १० ते १ वाजेपर्यंत व दुसरा टप्पा १ ते ६ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. सदर महोत्सवात सर्व जाती धर्म व समाजातील महिला आपल्या पारंपारिक वेशभूषेत येणार असून आप-आपल्या संस्कृतीच्या कला सादर करणार आहेत. महोत्सवातील भाग घेतलेल्या स्पर्धेतील विजेत्या महिलांना प्रथम पारितोषिक रु. ११,१११/- , द्वितीय पारितोषिक रु. ७,७७७/- , तृतीय पारितोषिक रु. ५,५५५/- तसेच रु. २१००/- प्रत्येकी ५ उत्तेजनार्थ पारितोषिकांचा वर्षाव होणार असून सहभाग घेतलेल्या स्पर्धकांनाही पैठण्या, मोबाईल, किचन भांडीच्या वस्तू यांसारख्या आकर्षक पारितोषिकांनी गौरविण्यात येणार आहे. सदर महोत्सवात १८8 वर्षावरील महिलांचा सहभाग असणार असून ज्या महिलांना कार्यक्रमात भाग घ्यावयाचा असेल त्यांनी नाव नोंदणीकरिता आरती राऊळ ९९६७६४८०९१, आर.आर.पाटील ९१३७६५४०२९, हेमंत कोळी ९१६७३०२८२७ यांना संपर्क करण्याचे तसेच “गौरव, प्लॉट नं.एफ-८, सेक्टर-२९, अग्रोळी गाव, बेलापूर नवी मुंबई” या पत्त्यावर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.