स्वयंम न्यूज ब्युरो : navimumbailive.com@gmail.com
मुंबई : ज्येष्ठ नेत्या व दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या निधनामुळे एक कणखर व दूरदर्शी नेतृत्व हरपल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
शीला दीक्षीत यांनी आपल्या १५ वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत दिल्लीचा चेहरामोहरा बदलून टाकला होता. मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा व नागरी सुविधांची उभारणी करून त्यांनी दिल्लीचा संपूर्ण कायापालटच केला होता. त्या विचारधारेशी एकनिष्ठ व खंबीर नेत्या होत्या. महिला अत्याचारांच्या विरोधातही त्यांनी मोठा संघर्ष केला. त्यांच्या अनुभवाची पक्षाला गरज असताना अकस्मात झालेले त्यांचे निधन धक्कादायक असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.