स्वयंम न्यूज ब्युरो : navimumbailive.com@gmail.com
जिल्हाध्यक्ष माणिकराव जगताप यांनी केली नियुक्ती
पनवेल : कॉंग्रसच्या विचारांची पताका अखंडपणे फडकत ठेवणारे रायगड जिल्हा विचार सेलचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्यावर रायगड जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष माणिकराव जगताप यांनी नवी जबाबदारी सोपवली आहे. रायगड जिल्हा कॉंग्रेसच्या उपाध्यक्षपदी कडू यांची निवड केल्याचे पत्र त्यांना दिले आहे. तशी घोषणा अलिबाग येथील भव्य कार्यकर्ता मेळाव्यातूनही त्यांनी केली.
कवी, पत्रकार सामाजिक कार्यकर्ते, उत्तम वक्ते, सांस्कृतिक क्षेत्रातील भरीव कामगिरी आणि नागरिकांच्या पायाभूत समस्यांसाठी केलेली आंदोलने तसेच त्यांच्यातील नेतृत्व गुण हेरून माणिकराव जगताप यांनी कांतीलाल कडू यांची वर्णी रायगड जिल्हा कॉंग्रेसच्या उपाध्यक्षपदी लावली आहे.
कडू यांची साहित्य क्षेत्रातील कामगिरी पाहता उत्कृष्ट अशी चार पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पाचवे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. नाट्य, सांस्कृतिक क्षेत्रात तर त्यांनी मैलाचा दगड पार करून पनवेल तालुक्यातील रसिकांना अविट गोडीच्या अनेक कलाकृती सहज आणि निशुल्क उपलब्ध करून दिल्याने अल्पावधीत कडू यांची कीर्ती गगनाला गवसणी घालण्यास सिद्ध झाली आहे.
पाणी प्रश्न, अतिक्रमण, रस्ते, आयटीआय, वीज पुरवठा, जलप्रदूषण ते सामान्यांना पायाभूत सुविधांसाठी थेट प्रस्थापित राजकीय नेत्यांसह प्रशासनाशी दोन हात करून सामन्यांसाठी आंदोलन करणारे निर्भीड नेतृत्व म्हणून कडू नावारूपास आले आहेत.
पनवेल आणि परिसरात रिक्षा संघटना उभारून प्रवासी आणि रिक्षा चालक यांच्यात सेवेचा सेतू त्यांनी उभारला असल्यानेच ते अधिक लोकप्रिय ठरत आहेत.
आपल्या शब्द अस्त्राने अनेकांना घायाळ करून समाजहिता आड येणार्या प्रत्येकाला उलटे आकडे मोजायला लावणारे जहाल मतवादी पत्रकारितेतून त्यांनी पत्रकारिता क्षेत्राला नवा आयाम दिला आहे. अतिशय परखड मतांचे पुरस्कर्ते पत्रकार म्हणून त्यांची ख्याती असून लिखाणाचा एक वेगळा बाज त्यांच्या पत्रकारितेतून डोकावत आहे. त्यांच्यातील संघटन कौशल्यामुळे त्यांची ही निवड करण्यात आली आहे.
अलीकडे पनवेल महापालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या बदलीविरोधात त्यांनी भाजपा शिवसेना वगळता सर्व पक्षांना समाविष्ट करून पनवेलला महापालिका क्षेत्रातील जनसामन्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी केलेले आंदोलन सत्ताधार्यांच्या जिव्हारी बसले आहे. पाणी प्रश्नावर आंदोलन छेडून पनवेलमध्ये त्यांच्या ताकदीचा एक इशारा देण्यात ते यशस्वी झाले आहेत.
ज्येष्ठांसाठी मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन, रक्तदान तसेच तरुणांना व्यसनाधीनतेपासून अलिप्त ठेवण्यासाठी गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थावरील बंदीचे समर्थन करत तीची अधिक तीव्रतेने अंमलबजावणी व्हावी म्हणून सातत्याने प्रयत्नशील राहून अधिकार्यांना कार्यमग्न ठेवण्यात कडू यशस्वी झाले आहेत.
डान्स बार विकृतीला पायबंद घालण्यासाठी समाज प्रबोधन आणि आंदोलनातून त्यांनी महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधले होते. डान्सबार विरोधी आधीसूचना काढण्यात यावी, अशी मागणी करून या प्रकरणाचे गांभिर्य त्यांनी अधोरेखित केले आहे.
त्यांच्या चौकस कामांची दखल घेऊन अखिल भारतीय कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष खा. राहुल गांधी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी कांतीलाल कडू यांची निवड करण्यात येत असल्याचे जिल्हाध्यक्ष माणिकराव जगताप यांनी पत्रात म्हटले आहे.