स्वयंम न्यूज ब्युरो : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर १८ परिसरातील विद्युत उपकेंद्रात बसणाऱ्या मद्यपिंचा बंदोबस्त करून गस्त वाढविण्याची मागणी प्रभाग ९६ मधील नगरसेविका सौ. रूपाली किमसत भगत यांनी नेरूळ पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांकडे लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर १८ मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकालगत एमएसईडीसीचे विद्युत उपकेंद्र (सबस्टेशन) आहे. या विद्युत उपकेंद्रामधील जागेचा दुरूपयोग होत असून काही मद्यपि लोकांकडून या जागेचा दारू पिण्यासाठी अथवा दारूच्या पार्ट्या करण्यासाठी वापर केला जात आहे. आपण या ठिकाणी आपण पोलिसांना गस्त घालण्याचे निर्देश दिल्यास आपणास समस्येचे गांभीर्य निदर्शनास येईल. या ठिकाणी आम्ही सातत्याने महापालिका कर्मचाऱ्यांकडून सफाई करवून घेत असताना दारूच्या बाटल्यांचे ढिगारे आम्हाला उचलावे लागतात. यामुळे परिसराला बकालपणा आला असून दारू पिल्यानंतर होणारे आपसातील शिविगाळ व अन्य प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेलाही धोका निर्माण झाला आहे. हा नागरी वस्तीचा परिसर असल्याने या दारू पिण्याच्या कार्यक्रमामुळे महिला वर्गात विशेषत: तरूण मुलींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आपण स्थानिक पोलिसांकडून या मद्यपि लोकांना योग्य धडा शिकवावा. या ठिकाणी सातत्याने पोलिस गस्त झाल्यास या समस्येचे निवारण होवून महिला वर्गालाही दिलासा प्राप्त होईल. सर, समस्येचे गांभीर्य पाहता आपण लवकरात लवकर कारवाईस सुरूवात करावी अशी मागणी नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी केली आहे.
याबाबत एमएसईडीसचे अभियंता व उपअभियंत्यांनाही स्वतंत्र लेखी निवेदना देताना विद्युत उपकेंद्राची स्वच्छता व साफसफाई करून तेथील बकालपणा हटविण्याची मागणी नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी केली आहे.