सुवर्णा खांडगेपाटील : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महाराष्ट्रातील पूरग्रस्त बंधू भगिनींना मदत करुन त्यांच्या जीवनातील हरवलेले सूर पुन्हा एकदा जुळण्यासाठी नगरसेविका सौ.रुपाली किस्मत भगत आणि समाजसेवक गणेशदादा भगत यांनी स्थानिक जनतेला आणि मित्र परिवारास पुरग्रस्तांच्या मदतीसाठी केलेल्या आव्हानाला सर्व नागरिकांनी माणुसकीच्या नात्याने उत्तम प्रतिसाद देत सढळ हाताने शक्य ती मदत केली.
नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर कपडे, बिस्किटे, पाणी, धान्य, औषधे व इतर वस्तू नेरुळ सेक्टर-१६ नगरसेविका जनसंपर्क कार्यालयात जमा केले. १२ ऑगस्ट१९ रोजी जमा झालेल्या वस्तू ट्रक मध्ये भरून मदत संकलन केंद्र-माथाडी भवन पहिला मजला,एपीएमसी,तुर्भे येथे समन्वयक यांच्याकडे सुपूर्द केल्या.
शिवाजी पिंगळे, आनंदराव पवार, दिलीप खांडे,गोरक्षनाथ गांडाल, प्रमोद प्रभु, शांताराम मातेले, शांताराम कुऱ्हाडे, अशोक गांडाल, सागर मोहिते, सूर्या पात्रा, जिमी सप्रा, रविंद्र भगत, संतोष शिंदे, संजय गांडाल, मंगेश कदम, विनय शेडगे, श्रीधर मोरे, मन्सूर कोतवडेकर, रोहित चव्हाण, सुभाष यादव, अरुण यादव, गौरव सूर्यवंशी, सुदीप बांद्रे, सुमित गायकवाड, अमर मोरे, मयुर पवार, सिद्धेश गुरव, रोहित भोसले,पवन पवार, राजेश घाडी, संदेश घाडी, नवीन पातेरे, संकेत क़ुर्लेकर, विजय पातेरे, विजय पिंगळे, समीर परबलकर, अविनाश तिकोणे, स्वप्निल परंडवल, संतोष पावसकर, रितेश मांदाडकर यांनी मदत फेरी काढण्यापासून ते जमा झालेल्या वस्तू मदत संकलन केंद्रापर्यंत पोहचविण्यापर्यंत विशेष मेहनत घेतली.