नगरसेविका रूपाली भगत यांच्या पाठपुराव्याची घेतली दखल
सुजित शिंदे : navimumbailive.com@gmail.com / 9619197444
नवी मुंबई : प्रभागातील नागरी समस्यांचे गांभीर्य महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास यावे यासाठी नेरूळ नोडमधील प्रभाग ९६च्या नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी प्रभागात पाहणी अभियान राबविण्याविषयी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याची दखल घेत महापालिका प्रशासनाकडून अखेर गुरूवारी प्रभाग ९६ मध्ये पाहणी अभियान राबविण्यात आले.
स्थानिक नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत यांच्या मागणीनुसार नेरुळ प्रभाग क्रमांक-९६ मधील समस्यांची पाहणी करण्यासाठी नवी मुंबई महानगर पालिकेचे सचिन नामवाड( कनिष्ठ अभियंता ), राजेंद्र इंगळे ( स्वच्छता अधिकारी), सुरेश लगदिवे( उपअभियंता पाणी पुरवठा), महेश बाविस्कर ( कनिष्ठ अभियंता मलनिस्सारण ), संजयसिंग पाटील ( कनिष्ठ अभियंता विद्युत), सचिन अहेरकर( तारतंत्री विभाग) या अधिकारी वर्गाने पाहणी दौरा केला.
या वेळी नगरसेविका रुपाली किस्मत भगत यांनी प्रभागात असलेल्या रस्ते, गटर, पदपथ, स्ट्रीट लाईट, डेब्रिज कचरा, उद्यान,शाळा, ग्रंथालय अभ्यासिका, मार्केट, चौक , नामफलक व इतर नागरी सुविधाविषयक समस्या अधिकारी वर्गाच्या निर्दशनास आणून दिल्या आणि लवकरात लवकर सदर समस्या दूर करण्याच्या सूचना अधिकारी वर्गास केल्या. अधिकारी वर्गानेही सदर समस्या लवकरच सोडविण्यात येतील असे आश्वासन दिले.
या वेळी समाजसेवक गणेशदादा भगत,चंद्रकांत महाजन, सागर मोहिते, सूर्यकांत देसाई, मन्सूर कोतवडेकर, दिनेश कणसे, रविंद्र भगत उपस्थित होते.