स्वंयम न्यूज ब्युरो :navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : दहीहंडीच्या दिनी कुकशेत गावात लहान मुलांपासून खुल्या गटापर्यत सर्वासाठीच नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रभाग ८५च्या कार्यसम्राट नगरसेविका आणि महापालिका महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी केले आहे.
कुकशेत गावातील जय गजानन मित्र मंडळाच्या वतीने दहीकाला उत्सव २०१९च्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही या नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दुपारी ३ वाजल्यापासून रात्री शेवटचे दहीहंडी पथक येईपर्यत ही नृत्य स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत विविध पारितोषिकांची रेलचेल असून सहभागी प्रत्येक सहभागाला प्रोत्साहनात्मक विशेष पारितोषिकही दिले जाणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सुचिता पाटील (९५९४९८८७५८), अलंका ठाकूर (९७०२८११३५९), सुगंधा तळेकर (९३२०९६९६५१), श्रेया चौधरी (९८२०१९९०४९), जयश्री पाटील (९३२४२९६३६८), प्रितेश पाटील (९८२१९९८६५५), संदीप पाटील (७०२१४९९१६३), जया आतकरी (८१०८०५४७१६) यांच्याशी संपर्क साधून नेरूळ नोडमधील नृत्याची आवड असणाऱ्या सर्वांनीच मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन सभापती सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी केले आहे.