सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नेरूळमधील आगरी-कोळी भवनचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे सिडकोचे माजी संचालक व शिवसेना नगरसेवक नामदेव भगत हे स्वच्छतेच्या बाबतीत कमालीचे आग्रही व आक्रमक असल्याचे महापालिका कामकाजात नेहमीच पहावयास मिळते. नेरूळ सेक्टर २६ मधील वॉटर बॉडीमधील स्वच्छतेविषयी पालिका शहर अभियंत्याकडेच लेखी मागणी करत त्यांनी आपली शहर स्वच्छतेची आस्था पुन्हा एकवार नवी मुंबईकरांना दाखवून दिली आहे.
नेरूळ सेक्टर २६ मध्ये असलेल्या वॉटर बॉडीमध्ये प्लॉस्टिकच्या बाटल्या, पिशव्या, शेवाळ, कुजलेला कचरा मोठ्या प्रमाणावर आहे. हा सर्व कचरा वॉटर बॉडीच्या किनाऱ्यावर असल्याने त्या ठिकाणी जॉगिंग ट्रॅकवर चालणाऱ्या रहीवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून संबंधितांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे. हा कुजलेला कचरा, शेवाळ व प्लॉस्टिक तात्काळ काढून सुशोभीकरण करण्याची मागणी नामदेव भगत यांनी महापालिका शहर अभियंत्यांकडे केली आहे.