सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ / navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई – नवी मुंबईतील साईभक्त सेवा मंडळाच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा व गोपाळकाला निमित्त पहिल्यांदाच सानपाड्याची ‘साई हंडी’ या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सानपाडा येथील कै. डी. व्ही.पाटील मास्तर मैदान येथे शुक्रवारी मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव निमित्ताने धार्मिक कार्यक्रम झाला. रात्री उशिरा कृष्णजन्म कथा, गाणी तसेच पूजाविधी पार पडला. परिसरातील चिमुरड्यांनी बालकृष्णाची वेषभूषा परिधान केल्याने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. भजनी मंडळाने मंत्रउच्चारण, आरती गायन व गीते सादर केली. मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास मोठ्या उत्साहात श्रीकृष्ण जन्माचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी रात्री देवनाथ म्हात्रे यांच्या ‘आम्ही नेरुळकर’ या गोविंदा पथकाने पाच थर रचून हंडी फोडली. शनिवारी सकाळपासून बाळगोपाळांची दहीहंडी रंगली. ‘गोविंदा रे गोपाळा’च्या जयघोषणांनी परिसर दणाणून गेला होता.उंच थर लावून दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. यंदाची दहीहंडी पूरग्रस्तांना समर्पित करण्यात आली. सायंकाळी ६ वा. ते रात्री १० वाजेपर्यंत निर्माता – दिग्दर्शक राकेश नाईक यांच्या ‘महाराष्ट्राची मराठ मोळी संस्कृती’ या लोकगीते, कोळीगीते आणि गीत संगीताचा कार्यक्रम रंगला. कार्यक्रमाच्या सहनिर्मात्या व ढोलकीच्या तालावर फेम अभिनेत्री अस्मिता सुर्वे, विठू माऊली सिरीयल फेम अभिनेत्री वंदना पांचाळ यांच्या लावणीने बाळ गोविंदांची व प्रेक्षकांची मने जिंकली. जवळपास १०० पेक्षा जास्त बाळ गोविंदा पथकांनी येथे हजेरी लावली. नेरुळ गावातील देवनाथ म्हात्रे यांच्या ‘आम्ही नेरुळकर’ या गोविंदा पथकाने सहा थर रचून सानपाड्याची मानाची ‘साई हंडी’ फोडली. यावेळी लोकनेते गणेश नाईक, महापौर जयवंत सुतार, माजी महापौर संजीव नाईक, नगरसेविका नेत्रा शिर्के, नगरसेवक गिरीश म्हात्रे, परिवहन समिती सदस्य प्रदीप गवस, युवा नेते वैभव नाईक, सानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास रामुगडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष गजानन काळे, उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले, शहर सहसचिव विलास घोणे, मनसे कर्मचारी युनियनचे शहर अध्यक्ष आप्पासाहेब कोठुळे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, उपशहर अध्यक्ष संदेश डोंगरे, माजी परिवहन समिती सदस्य विसाजी लोके, समाजसेवक राजेश ठाकूर, समाजसेवक महेश पाटील, समाजसेवक श्रीराम मढवी, समाजसेविका शैला पाटील, समाजसेविका दीप्ती पन्हाळकर, शिवसेना उपविभाग प्रमुख विनोद माने आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते. प्रत्येक गोविंदा पथकाला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साईभक्त सेवा मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग आमले, सचिव योगेश शेटे, खजिनदार गौरव मातोंडकर, उपाध्यक्ष विश्वास कणसे, उपसचिव सुरेश पडवळ, उपखजिनदार अमन गोळे, कायदेविषयक सल्लागार Advocate अक्षय काशिद, हिशोब तपासणीस श्रीकांत चव्हाण, सल्लागार मंदाकिनी कुंजीर, सल्लागार अमोल मोरे, सल्लागार भरत ठाकूर, सल्लागार सुनिल भास्कर तसेच मंडळाचे कार्यकर्ते शशिकांत भिलारे, सुधीर बाणखेले, जय झरबडे, संकेत पाटील, चेतन पन्हाळकर, वैभव भास्कर, ऋषिकेश कणसे यांच्यासह मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.