सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरुळ प्रभाग क्रमांक-९६ मधील नागरिकांच्या मागणीनुसार स्थानिक नगरसेविका सौ.रुपाली किस्मत भगत यांच्या विशेष प्रयत्नाने नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत छत्रपती संभाजी राजे उद्यान सेक्टर-१६ येथे उभारण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाचे लोकार्पण रविवारी, १ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता नवी मुंबईचे महापौर जयवंतजी सुतारांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित नागरिकांनी नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत यांच्या कामाचे कौतुक करून नागरिकांसाठी सार्वजनिक शौचालय उभारल्याबद्दल नवी मुंबई महानगर पालिका प्रशासन आणि महापौरांचे आभार मानले.
प्रभाग क्रमांक-९६ मधील उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना अधिकारी वर्गास दिल्या असून अजून कोणती कामे शिल्लक असतील तर त्याची यादी माझ्याकडे आणून द्या, जेणेकरून सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करता येतील असे आश्वासन महापौरांनी उपस्थित नागरिकांना दिले.
कार्यक्रमप्रसंगी गणेशदादा भगत, प्राजक्ता प्रभू, विमल गांडाल, छाया चव्हाण, संजय पाथरे, शिवाजी पिंगळे, गोरक्षनाथ गांडाल, चंद्रकांत महाजन, अंकुश माने, दयानंद दुरगुडे, शशिकांत गोरड, अनंत कदम, सूर्यकांत देसाई, समाधान कांबळे, शांताराम कुऱ्हाडे, सागर मोहिते, शांताराम मातेले, विठ्ठल गांजवे, रमेश सोनार, महादेव यादव, लक्ष्मण बांगर, सुरेश बोराटे, भीमराव कांबळे, सुरेश ठाकूर, सूर्या पात्रा, विजय चव्हाण, दिनकर फडतरे, विलास विधाते, विजय पातुरे, दिलीप म्हस्के, पोपट पवार, गणेश नागरगोजे, मन्सूर कोतवडेकर, रुणाल सुर्वे, संतोष नागरगोजे, सुभाष यादव, रविंद्र भगत उपस्थित होते.