सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ नोडमध्ये लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समितीचा गणेशोत्सव हा नवी मुंबईसाठी भक्तीचा, श्रध्देचा व प्रबोधनाचा विषय बनला आहे. या गणेशोत्सवाच्या माध्यमातून गेल्या अडीच दशकाहून अधिक काळ लोकप्रबोधन हाच विषय या देखाव्यातून मांडला जात असून समाजसुधारणा आणि वाईट चाली-रितींविरोधात प्रहार यामुळे हा गणेशोत्सव लोकप्रबोधन व सामाजिक सुधारणा यासाठी ओळखला जातो. सिडकोचे माजी संचालक, शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत हे या गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक असून त्यांच्या संकल्पनेतूनच लोकप्रबोधनाचे कार्य गेल्या अडीच दशकाहून अधिक काळ या मंडळाकडून सुरू आहे. नेरूळ सेक्टर १० मधील साईबाबा हॉटेलच्या मागील चौकात रेल्वे पादचारी पुल संपल्यावर समोरच आपणास हा गणेशोत्सव पहावयास मिळतो. यंदाच्या गणेशोत्सवामध्ये ‘मोबाईल – शाप की वरदान’ यावर जनजागृती करताना लोकप्रबोधनाचा देखावा उभारण्यात आला आहे. मोबाईलमुळे आजच्या समाजव्यवस्थेवर काय परिणाम होत आहे हे देखाव्यातून दाखविताना मंडळाचे संस्थापक नामदेव भगत यांन जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.
नेरूळच्या लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समितीचा गणेशोत्सवातून मोबाईल- शाप की वरदान यावर जनजागृती करण्यात आली आहे.